marathi mol

Affiliate Marketing बद्दल संपूर्ण माहिती Affiliate Marketing Information In Marathi

Affiliate Marketing Information In Marathi मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की ऑनलाईन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. तर मित्रांनो आज आपण अनेक पर्यायांपैकी एक म्हणजेच Affiliate Marketing बद्दल चर्चा करणार आहोत. Affiliate marketing हा ऑनलाईन पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे, ज्यामध्ये आपण घरी बसून सुद्धा खूप पैसे कमवू शकतो आणि अशा प्रकारे बरेच लोक लाखो रुपये कमवत आहेत.

Affiliate Marketing Information In Marathi

Affiliate Marketing बद्दल संपूर्ण माहिती Affiliate Marketing Information In Marathi

पैसे कमवण्याचे हे मार्ग बेकायदेशीर नाही आणि हे काम करण्यासाठी कोणतीही investment करावी लागत नाही.

कंपनी आपले स्वतःचे उत्पादन बनवते आणि ग्राहकाला विकते आणि नफा कमवते पण ही कंपनी आपली विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या डिजिटल मार्केटिंगमधील पर्यायांचा वापर करते आणि यातील हा एक पर्याय तो म्हणजे Affiliate Marketing. या पर्यायामध्ये कंपनी affiliate प्रोग्रॅम ठेवते, जो कोणी त्यासाठी रजिस्टर करेल तो कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटिंग करून पैसे कमवू शकेल.

Affiliate Marketing म्हणजे काय ?

Affiliate marketing हे एक ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग आहे ज्यामध्ये आपण कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटिंग करून आणि ते विकून पैसे कमवू शकतो. जेंव्हा एखादी व्यक्ती कंपनीचे वस्तू विकते तेंव्हा त्याला कंपनीकडून Affiliate कमिशन मिळते आणि त्या व्यक्तीस Affiliate मार्केटर असे म्हंटले जाते.

यातील Affiliate कमिशन म्हणजे product चा किंमतीची टक्केवारी. हे Affiliate कमिशन कंपनी आणि उत्पादनानुसार बदलते. काही कंपनी 10% पर्यंत Affiliate कमिशन देते तर काही कंपनी 70% पर्यंत देते.

म्हणजेच जर एखादी कंपनी 100 रुपयांना एखादे product विकत असेल आणि २० % Affiliate कमिशन देत असेल, जर कोणी हे product ग्राहकाला विकत असेल तर कंपनी त्याला 20 % प्रमाणे कंपनी 20 रुपये कमिशन देईल.

Affiliate product हे फक्त कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा खाद्यपदार्थ नाही, तर ते एक कोर्स, ऑफर देखील असू शकते ते पूर्णपणे तुम्ही जोडलेल्या Affiliate प्रोग्रॅम वर अवलंबून असते.

Affiliate Marketing मध्ये वापरलेले जाणारे शब्द :-

1) Affiliate Program :- Affiliate program म्हणजे कंपनीने ठेवलेले सुविधा जी product च्या Affiliate Marketing चे काम पाहते. काही कंपनी आपले स्वतःचे Affiliate प्रोग्रॅम स्वताच ठेवते तर काही कंपनीसाठी Affiliate प्रोग्राम दुसरी कंपनी सांभाळते.

2) एफिलिएट लिंक :- जेंव्हा आपण Affiliate program साठी रजिस्टर करतो, तेंव्हा आपल्याला Affiliate program कडून आपल्याला करायच्या असणाऱ्या प्रॉडक्ट ची एक लिंक भेटते जिला एफिलिएट लिंक असे म्हणतात.

Product ची मार्केटिंग करताना एफिलिएट लिंक खूप महत्वाची असते कारण जेंव्हा एखादि व्यक्ती त्या एफिलिएट लिंकवरून क्लिक करून वस्तू घेते तेव्हा आपल्याला Affiliate कमिशन मिळते. जर तुम्ही वस्तूची मार्केटिंग करताना तुम्ही एफिलिएट लिंक न टाकता फक्त वस्तूची लिंक टाकली आणि जर कुणी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तूच्या खरेदीवरचे कमिशन मिळणार नाही.

3) Affiliate Marketer :- Affiliate Marketer म्हणजे व्यक्ती जी Affiliate Program वर रजिस्टर करते, तिथून कोणत्याही product ची Affiliate लिंक घेते आणि product ची मार्केटिंग करतो आणि वस्तू विकून कमिशन मिळवतो.

Affiliate Marketing कसे कार्य करते?

Affiliate Marketing मध्ये आपल्याला आपला product बनविण्याची मेहनत न घेता आपण दुसऱ्या कंपनीने बनवलेली वस्तू विकून पैसे कमवू शकतो. Affiliate Marketing मध्ये तीन जणांचा समावेश होतो. त्यातील पाहिलं म्हणजे कंपनी त्यांनतर येत एफिलिएट मार्केटर आणि म त्यांनतर येत ग्राहक.

या तिघांमधील कंपनी हे आपली वस्तू बनवते आणि वेगळ्या पदतीने आपल्या वस्तूची मार्केटिंग करते. एफिलिएट मार्केटर हा कंपनीच्या affiliate प्रोग्राम ला join करते आणि product ची वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करते, जेंव्हा ग्राहकाला product ची advertise दिसते व त्या product ला खरेदी करतो तेंव्हा एफिलिएट मार्केटरला वस्तू विकण्याचे पैसे मिळते.

अशाप्रकारे थोडक्यात सांगायचे झाले तर एफिलिएट मार्केटर हा कंपनीचे प्रोडक्ट ज्यांना त्या प्रोडक्ट ची गरज आहे अशा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यास मदत करतो, या मुळे कंपनीनेही प्रोडक्ट विकले जाते, एफिलिएट मार्केटरलाही कमिशन मिळते आणि ग्राहकालाही हवी असणारी वस्तू मिळते.

मी देखील Affiliate Marketing करू शकतो?

होय, तुम्ही निश्चितपणे Affiliate Marketing करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आवडीचा Affiliate Program जोडावा लागेल आणि तेथून तुम्हाला Affiliate लिंक घेऊन तुमच्या सोशल मीडियावर किंव्हा वेबसाईट बनवून त्यावर product विषयी माहिती सोबत शेअर करावे लागेल. तुमच्याकडे search इंजिन वर advertise लावण्याचे कौशल्य असल्यास तुम्ही त्याचा वापर करून देखील वास्तूची मार्केटिंग करू शकता.

एफिलिएट प्रोग्राम कसा शोधायचा?

जर तुम्ही Affiliate Marketing करण्यासाठी तयार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आवडीनुसार एफिलिएट प्रोग्राम जोडावे लागेल.

तुम्हाला एफिलिएट प्रोग्राम कसे जोडायचे हे माहित करून घ्यायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील search इंजिन उघडा.
  2. search इंजिन उघडल्यानन्तर तेथे तुमचे जे Niche आहे, ते टाका व त्याच्या पुढे Affiliate program असे टाका व शोधा, जसे कि जर तुमचे Niche Travelling असल्यास तुम्ही search इंजिनवर Travelling Affiliate program असे शोधा.
  3. Search इंजिनवर तुमचा Niche नुसार Affiliate program बद्दल शोधल्यावर तुमचा समोर तुमचा Niche संबंधित अनेक Affiliate program समोर येतील, त्यातील विविध Affiliate program ला चेक करून व तेथील माहिती बघून आणि जर तुम्हाला ठीक वाटल्यास, तुम्ही तेथे रजिस्टर करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा Niche नुसार Affiliate program शोधू शकता.

Affiliate Marketing साठी वेबसाइट असणे आवश्यक आहे का?

नाही, Affiliate Marketing साठी वेबसाइट असणे आवश्यक नाही आहे. तुम्ही विविध social नेटवर्किंग वेबसाईटचा वापर करून देखील Affiliate Marketing करू शकता, YouTube, Facebook, Instagram, Telegram, Quora आणि Pinterest या सारख्या खूप सोशल साइट्स आहेत, ज्यांचा वापर आपण मोफत करू शकतो, जेथे आपण product विषयी माहिती शेअर करून अनेक लोकापर्यंत आपला product पोहचउ शकतो. म्हणूनच आपल्याला Affiliate Marketing साठी वेबसाईट असण्याची गरज नाही आहे.

मोबाईल वरून आपण Affiliate Marketing करु शकतो का?

होय, Affiliate Marketing मोबाईलवरून करता येते. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरवर जाऊन तुमच्या आवडीच्या Affiliate Program मध्ये सामील व्हावे लागेल आणि मोबाईलवर विविध social नेटवर्कचे अँप्लिकेशन डाउनलोड करून जसे कि YouTube, Facebook, Instagram, Quara, Pinterest मध्ये product विषयी योग्य माहिती टाकून आपण मोबाइलवर Affiliate Marketing करू शकतो.

मोबाईल मध्ये विविध social नेटवर्कचे अँप्लिकेशन डाउनलोड केल्यांनतर सर्व ठिकाणी आपल्या Niche चा related सारख्या नावाचे अकाउंट सर्व social नेटवर्कवर उघडा. सर्व social नेटवर्क अकाउंट्स वर नेहमीतपणे तुमचा प्रॉडक्ट संबंधित content पोस्ट करा, तुमच्या ऑडियन्स चे प्रश्न सोडवा. तुमचा audience सोबत connect रहा.

त्यांना वेळेवेळेनुसार तुमचा product विषयी माहिती सांगा, ज्यांना तुमचा प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट असेल तर ते तुम्हाला contact करतील तेथे त्यांना तुमची affiliate लिंक द्या, अशा प्रकारे तुम्ही निवडलेल्या Niche मध्ये मोबाईलचा वापर करून तुम्ही social नेटवर्क साईट्स वर business वाढवू शकता.

Affiliate प्रोग्रॅम उदाहरण :-

मोठ्याप्रमाणात वापरले जाणारे Affiliate प्रोग्रॅम पुढील प्रमाणे आहे :-

  1. Amazon Affiliate प्रोग्रॅम
  2. Clickbank
  3. Flipkart
  4. Jvzoo
  5. CJ Affiliate

अशाप्रकारे हे Affiliate प्रोग्राम आज वेगवेगळ्या वस्तूची मार्केटिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही या “Affiliate मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याबद्दल माहिती” लेखात Affiliate marketing बद्दल सर्व महत्वाची माहिती सांगितली आहे जे तुम्हाला Affiliate Marketing सुरु करण्यास नक्कीच मदत करेल. जर तुम्हाला या बद्दल काहीही शंका असल्यास Comment बॉक्समध्ये नक्कीच विचारा.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!