marathi mol

आरोग्य सेतू अँप बद्दल संपूर्ण माहिती Arogya Setu Apps In Marathi

Arogya Setu Apps In Marathi मित्रानो भारतामध्ये कोरोना वाढत असताना, भारत सरकारने लोकांचा सोयीसाठी Arogya setu हे मोबाइल अँप्लिकशन काढले. Arogya setu हे 2 एप्रिल 2020 मध्ये सुरु झाले आणि हे अँप्लिकेशन वेगवेगळ्या 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Arogya Setu Apps In Marathi

आरोग्य सेतू अँप बद्दल संपूर्ण माहिती Arogya Setu Apps In Marathi

Aarogya Setu हे फक्त मोबाईल अँप्लिकेशन मध्ये उपलब्ध असून, हे अँड्रॉइड आणि IOS मोबाईलवर वापरू शकतो. आजचा वेळेत या अँप्लिकेशनचे 20 करोडोहुन अधिक वापरकर्ते आहेत. चला तर मग आरोग्य सेतू अँप्लिकेशन बद्दल अधिक माहिती जाणून घेउया.

Arogya setu अँप्लिकेशन कसे सुरु करायचे ?

Arogya setu हे अँप्लिकेशन सुरु करण्यासाठी, तुम्ही जर अँड्रॉइड किंव्हा IOS वापरकर्ते असाल तर आपल्या मोबाइल मधील अँप स्टोअर मधून Arogya setu चे अँप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.

Arogya setu चे डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यावर अँप्लिकेशन उघडा व Arogya setu अँप्लिकेशन सुरु करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

 • Arogya setu चे अँप्लिकेशन उघडल्यावर तुमचा समोर सर्वप्रथम भाषा निवडण्यासाठी येईल, तेथे तुम्हाला अँप्लिकेशन कोणत्या भाषेत वापरायचे आहे ते निवडा व खालील असणाऱ्या Next पर्यायावर क्लिक करा.
 • भाषा निवडून झाल्यांनतर तुम्हाला Arogya setu अँप्लिकेशन बद्दल माहिती दाखविण्यात येईल ती वाचा व तेथे तीन वेळा Next पर्यायवर क्लिक करा.
 • माहिती वाचल्यानन्तर तुमचा समोर Register करण्यासाठी पर्याय येईल, तेथे खालचा बाजूस काळ्या रंगात असणाऱ्या Register Now या पर्यायावर क्लिक करा.
 • Register Now या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर Arogya setu अँप्लिकेशन चा Terms of service & Privacy येतील तेथे तुम्ही हवे असल्यास वाचू शकता व नन्तर खालील असणाऱ्या I agree या पर्यायावर क्लिक करा.
 • अटी मान्य केल्यांनतर तुमचा समोर तुमचा मोबाइल नंबर टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे तुमचा मोबाईल नंबर टाका व खाली असणाऱ्या Submit या पर्यायावर क्लिक करा.
 • मोबाईल submit केल्यांनतर तुमचा समोर OTP टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे आपण टाकलेल्या मोबाइल नंबर वर मेसेजने आलेला OTP टाका व खालील Submit पर्यायावर क्लिक करा.
 • OTP सबमिट केल्यांनतर, तुमचा मोबाइल मधील Arogya setu चे अँप्लिकेशन सुरु होईल, तुम्ही आता तेथील सर्व पर्यायांचा वापर करू शकता.

अशाप्रकारे आपण Arogya setu चे अँप्लिकेशन सहजरित्या सुरु करू शकतो.

Arogya setu वर vaccination साठी register कसे करायचे ?

Arogya setu चा मदतीने आपण घरबसल्या कुठेही बाहेर न जाता vaccine साठी रजिस्टर करू शकतो.

तुम्हालाही जाणून घ्यायचे कि Arogya setu वर vaccine साठी रजिस्टर कसे करायचे तर पुढील स्टेप्स करा :-

 • Arogya setu सुरु केल्यावर तुमचा समोर Arogya setu मधील अनेक पर्याय समोर येतिल, तेथे समोर तुम्हाला चार मुख्य पर्याय दिसतील Your status, COVID updates, Vaccination आणि COwin, तेथे Vaccination या पर्यायावर क्लिक करा.
 • Vaccination या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर मोबाइल नंबर टाकून vaccine साठी रजिस्टर करण्यासाठी येईल तेथे मोबाईल नंबर टाका व खाली असणाऱ्या PROCEED TO VERIFY या पर्यायावर क्लिक करा.
 • PROCEED TO VERIFY या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमचा मोबाईल नंबर वर OTP पाठवला जाईल तो स्क्रीन वर OTP टाकण्यासाठी येणाऱ्या पर्यायामध्ये टाका व पुन्हा PROCEED TO VERIFY या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण Arogya setu वर मोबाईल नंबरच्या मदतीने रजिस्टर करू शकतो.

Arogya setu वर vaccination साठी Beneficiary कसे add करायचे How to add beneficiary in aarogya setu app ?

Arogya setu वर vaccination साठी रजिस्टर केल्यावर करावी लागणारी स्टेप ती म्हणजे Beneficiary add करणे आणि आपण एका मोबाइल नंबरने रजिस्टर केल्यास त्यात फक्त ४ Beneficiary add करू शकतो.

जर तुम्हालाही माहित करून घायचे असेल कि Beneficiary कसे ऍड करायचे तर पुढील स्टेप्स करा.

 • आपल्या मोबाईल मधील Arogya setu अँप्लिकेशन उघडा, Vaccination पर्यायामध्ये जा, मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय करून लॉग इन करा.
 • लॉग इन केल्यावर, तुमचा समोर Click here to add Beneficiary असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • Click here to add Beneficiary वर क्लिक केल्यावर तुमचा समोर Photo card ID type निवडण्यासाठी येईल, तेथे तुम्हाला जे ID कार्ड वापरायचे असेल ते निवडा, खाली ID कार्ड वरील नंबर टाका व नन्तर ID कार्ड वर असल्याप्रमाणे पूर्ण नाव टाका, लिंग निवडा, जन्मतारीख टाका व खाली निल्या रंगात असणाऱ्या SUBMIT या पर्यायावर क्लिक करा.
 • SUBMIT वर क्लिक केल्यावर Beneficiary ऍड होईल.

अशाप्रकारे आपण आरोग्य सेतूवर vaccination साठी रजिस्टर केल्यानन्तर Beneficiary add करू शकतो.

Arogya setu वर vaccine साठी कसे बुक करायचे How to book vaccination slot in aarogya setu ?

Arogya setu वर रजिस्टर केल्यांनतर आणि Beneficiary ऍड केल्यांनतर शेवटची स्टेप करावी लागते ती म्हणजे स्लॉट बुक करणे ज्यामुळे आपण आपल्या vaccination साठी आपल्याला हवे असणाऱ्या vaccnation सेंटर मध्ये स्लॉट बुक करू शकतो.

जर तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल कि स्लॉट बुक कसे करायचे त पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाईल मधील Arogya setu अँप्लिकेशन उघडा.
 • अँप्लिकेशन उघडल्यावर Vaccination या मुख्य पर्यायामध्ये जा, मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय करून लॉग इन करा.
 • तुमचा समोर तुम्ही ऍड केलेल्या beneficiaries दिसतील, तेथे ज्या Beneficiary साठी तुम्हाला vaccine स्लॉट बुक करायचे आहे, त्याच्या नावासमोर असणाऱ्या रखान्याला टिक करा व खाली असणाऱ्या SCHEDULE VACCINATION या पर्यायावर क्लिक करा.
 • SCHEDULE VACCINATION पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला पिन कोड विचारण्यात येईल, तेथे तुम्ही ज्या ठिकाणी vaccine घ्यायची आहे त्या ठिकाणचे पिन कोड टाका व खाली ज्या तारखेला vaccine घ्यायची आहे ते निवडा व खालील FIND VACCINATION CENTRE या पर्यायावर क्लिक करा.
 • FIND VACCINATION CENTRE या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर तुम्ही दिलेल्या पिन कोडचा ठिकाणचे vaccination सेन्टर समोर येतील, तेथे जेथे तुम्हाला घ्यायचे आहे ते समोर दिलेल्या वेळेनुसार निवडा व खाली असणाऱ्या Proceesd या पर्यायावर क्लिक करा.
 • Proceesd या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर स्लॉट कन्फर्म करण्यासाठी विचारण्यात येईल तेथे CONFIRM APPOINTMENT या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण घरबसल्या Arogya setu अँप्लिकेशन चा मदतीने घरबसल्या आपल्या जवळपासच्या vaccination सेन्टरमध्ये vaccine स्लॉट बुक करू शकतो.

Arogya setu वर vaccine availability कशी चेक करायची ?

आपण Arogya setu अप्लिकेशन चा मदतीने कोणत्या भागात Vaccine उपलब्ध आहे हा हे बघू शकतो.

जर तुम्हालाहि माहिती करून घ्यायचे असेल कि Arogya setu वर vaccine availability कशी चेक करायचे तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाईल मधील Arogya setu अँप्लिकेशन उघडा.
 • Arogya setu अँप्लिकेशन उघडल्यानन्तर समोर असणाऱ्या मुख्य पर्यायांपैकी CoWIN या पर्यायावर क्लिक करा.
 • CoWIN या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमचा समोर vaccination संभंधित असणारे वेगवेगळे पर्याय येतील तेथे Vaccine availability या पर्यायावर क्लिक करा.
 • Vaccine availability या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर PIN code टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे तुम्हाला जेथे Vaccine availability चेक करायची आहे तेथील PIN code टाका.
 • PIN code टाकल्यानन्तर खाली असणाऱ्या तारखेच्या पर्यायामध्ये तुम्ही ज्या तारखेसाठी vaccine शोधत आहात, तेथे ती तारीख टाका.
 • तारीख निवडून झाल्यावर खाली दोन पर्याय असतील Free आणि Paid त्यातील तुम्हाला कोणती vaccine हवी आहे ते निवडा व खाली असणाऱ्या FIND VACCINATION CENTER या पर्यायवर क्लिक करा.
 • FIND VACCINATION CENTER या पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचा समोर तुम्ही निवडलेल्या पिन code चा ठिकाणी कोठे कोठे किती vaccine उपलब्ध आहेत ते दिसेल.

अशाप्रकारे आपण Arogya setu अँप्लिकेशनवर आपल्या जवळपास असणाऱ्या ठिकाणी vaccine availability चेक करू शकतो.

Aarogya Setu वर vaccination सर्टिफिकेट कसे मिळवायचे ?

आज अनेक ठिकाणि जाताना Vaccine घेणे गरजेचं बनलं आहे, जसे कि train मध्ये, बस मध्ये प्रवास करण्यासाठी जाताना आपल्याला vaccine सर्टिफिकेट आहे काय असे विचारले जाते. काहीवेळा अनेकांनी vaccine तर घेतली असते पण त्यांच्याकडे त्याचा सर्टिफिकेट नसतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि vaccine घेतल्यानन्तर vaccine सर्टिफिकेट कसा मिळवायचा तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाईल मधील Arogya setu अँप्लिकेशन उघडा.
 • Arogya setu अँप्लिकेशन उघडल्यानन्तर समोर असणाऱ्या मुख्य पर्यायांपैकी CoWIN या पर्यायावर क्लिक करा.
 • CoWIN या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमचा समोर vaccination संभंधित असणारे वेगवेगळे पर्याय येतील तेथे Vaccination certificate या पर्यायावर क्लिक करा.
 • Vaccination certificate या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर Beneficiary reference id विचारण्यात येईल जो तुम्हाला Vaccination साठी Beneficiary ऍड करताना मेसेजने येतो, तेथे तुमचा Beneficiary reference id टाका.
 • Beneficiary reference id टाकल्यानन्तर खालील GET CERTIFICATE या पर्ययावर क्लिक करा.
 • GET CERTIFICATE या पर्ययावर क्लिक केल्यावर समोर येणाऱ्या DOWNLOAD PDF या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकरे आपण vaccine घेतल्यानन्तर Arogya setu अँप्लिकेशनवर Certificate डाउनलोड करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या “Arogya setu अँप बद्दल माहिती आणि Arogya setu अँप कसे वापरायचे ?” लेखात Arogya सेतू अँप्लिकेशन बद्दल महत्वाची माहित आपल्या मराठी भाषेत सांगितली आहे, जी तुम्हाला Arogya setu अँप्लिकेशन समजून घेण्यास नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!