marathi mol

Flipkart बद्दल संपूर्ण माहिती Flipkart Information In Marathi

Flipkart Information In Marathi मित्रानो आजकाल Flipkart इतक्याप्रमाणत वापरला जातोय कि तुम्ही याच नाव एकदा तरी ऐकलंच असेल. Flipkart हे शॉपिंग साठी वापरण्यात येणारे ऑनलाईन इकॉमर्स स्टोअर आहे. फ्लिपकार्ट ची सुरवात ऑक्टोबर 2007 मध्ये झाली. याचा शोध हा बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी लावला. Flipkart सध्याचा काळातील भारतामधील सर्वात वर असणाऱ्या ईकॉमर्स स्टोर पैकी एक आहे.

Flipkart Information In Marathi

Flipkart बद्दल संपूर्ण माहिती Flipkart Information In Marathi

आज भारतामध्ये घर घरामधून बहुतेक जन फ्लिपकार्टवर शॉपिंग करत आहेत. फ्लिपकार्ट हे एक उत्तम सर्विस देणार ईकॉमर्स स्टोर आहे. त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट 24 x 7 कस्टमर केअर सुविधा सुद्धा देतो आणि payment करण्यासाठी विविध पर्यायदेखील देतो. Flipkart हे अँप्लिकेशन आणि website अशा दोन्ही मध्ये उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया flipkart बद्दल.

Flipkart वर खाते कसे open करावे ?

फ्लिपकार्ट वापरण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे flipkart वर अकाउंट तयार करणे. यासाठी जर आपण अँड्रॉइड वापरकर्ते असाल तर फ्लिपकार्ट चे अँप्लिकेशन डाउनलोड करा किव्हा जर आपण लॅपटॉप वापरकर्ते असाल तर फ्लिपकार्ट च्या वेबसाइट ला भेट द्या.

अँप्लिकेशन किव्हा वेबसाईट उघडल्यानन्तर खाली दिल्यागेल्या प्रमाणे स्टेप्स करा :-

 • फ्लिपकार्ट चा वरचा बाजूस असणाऱ्या “Login” बटनावर क्लिक करा.
 • “Login” बटनावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर नवीन पेज लोड होईल तेथे खाली असणाऱ्या “Create an account” या पर्यायावर क्लीक करा.
 • समोर आलेल्या बॉक्समध्ये आपला मोबाइल नंबर टाका व “Continue” बटनावर क्लिक करा.
 • समोर ओटीपी टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे टाकलेल्या मोबाइल नंबर वर आलेला ओटीपी टाका व तुमचं आवडीचा पासवर्ड टाकून “Signup” बटनावर क्लिक करा.
 • अशा प्रकारे फ्लिपकार्ट मध्ये खात तयार झालं आहे पण खात्यातील काही माहिती अपूर्ण असते त्यासाठी कोपऱ्यात दिसणाऱ्या my account या पर्यायात जाऊन account पर्यायावर क्लिक करा तेथे तुम्ही अपूर्ण असणारी माहिती पूर्ण करा जसे कि नाव, आपला पत्ता आणि “save changes” वर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण आपल्या मोबाइल नंबरचा वापर करून फ्लिपकार्ट वर खाते तयार करू शकतो व फ्लिपकार्ट चा सुविधेचा आनंद घेऊ शकतो.

Flipkart वरून वस्तू ऑर्डर कशी करावी ?

फ्लिपकार्टचे नवीन वापरकर्त्यांपैकी अनेकजण फ्लिपकार्टवर अनेक वस्तू पाहतात परंतु त्यांना माहीतच नसते कि ती वस्तू कशी मागवावी, त्यामुळे ते काही चुकीचा पर्यायावर क्लिक करतात आणि वस्तू मात्र ऑर्डर होत नाही.

जर तुम्हाला Flipkart वर वस्तू कशी मागवावी हे माहित नसेल तर वस्तू मागविण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाईल किंव्हा संगणकामधून फ्लिपकार्ट उघडा व जी वस्तू तुम्हाला order करायची आहे त्यावर क्लिक करा.
 • स्क्रीनवरील खालचाबाजूस दिसणारे “Buy Now” या पर्यायावर क्लिक करा.
 • समोर दिलेला पत्ता दिसेल तिथे तुम्ही हवे असेल तर बदल करू शकता व वस्तूची किंमत आणि डिलिव्हरी चार्जेस बघून continue बटनावर क्लिक करा.
 • समोर येणाऱ्या अनेक पेयमेन्ट मेथड्स मधून तुम्हाला जसे करायचे आहे ते निवडा.
 • समोर दिसणारा तीन अंक खाली दिलेल्या रकान्यात जसेच्या तसे टाका व “Confirm order” वर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण सहजरित्या फ्लिपकार्टवरून कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो.

Flipkart चे फायदे :-

Flipkart आज प्रचंड प्रमाणात वापरला जात आहे. अशा फ्लिपकार्टचे खूप फायदे आहेत.

फ्लिपकार्टचे चे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

 • कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, पुस्तके, अशा अनेक वस्तू घरबसल्या बसून मागवू शकतो.
 • मोबाईल, वीज, डिश टीव्ही असे अनेक प्रकारचे बिल भरू शकतो.
 • विमानाचे तिकीट बुक करू शकतो.
 • वस्तू ऑर्डर केल्यांनतर मिळणारे supercoin स्वरूपातील रिवॉर्ड पुढचा ऑर्डर साठी वापरू शकतो त्यामुळे पुढचा ऑर्डर वर फायदा मिळतो.
 • मोफत सिनेमे, मालिका बघू शकतो.
 • अनेक प्रकारचे गेम्स खेळून बक्षीस जिंकू शकतो.
 • काही शंका असल्यास 24 x 7 उपलब्ध असणाऱ्या फ्लिपकार्टचा कस्टमर केअरना फोन करून विचारू शकतो.

Flipkart plus नक्की काय आहे ?

Flipkart plus हे 15 ऑगस्ट 2018 मध्ये फ्लिपकार्टने सुरु केलेले memebrship सुविधा आहे. हि memebrship चालू करण्यासाठी तुम्हाला शॉपिंग केल्यांनतर मिळणारे 200 supercoins वापरावे लागतात.

तुमच्याकडे जर फ्लिपकार्ट प्लस memebrship असेल तर तुम्हाला मिळणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत :-

 1. मोफत शिपिंग
 2. जलद डिलिव्हरी
 3. जलद ग्राहक सेवा
 4. अनेक सेल्स चा फायदा लवकर घेऊ शकतात.
 5. Supercoin चा वापर करून अनेक वस्तू किंव्हा ऑफर्स घेऊ शकतो.

अशा प्रकारे जर आपल्याकडे फ्लिपकार्ट प्लस मेम्बरशिप असेल तर खूप फायदा होतो.

Flipkart वरील पेमेन्ट करण्यासाठीचे विविध पद्धती :-

Flipkart वापरताना हा एक उपयोगी गोष्ट ती म्हणजे येथे पेमेन्ट करण्यासाठी खूप पद्धती आहेत ज्यामुळे आपण आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या पद्धतीने पेमेन्ट करू शकतो.

फ्लिपकार्ट वर आपण पुढील दिलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने पेमेन्ट करू शकतो :-

 • कॅश ऑन डिलिव्हरी Cash on delievry
 • फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड
 • क्रेडिट कार्ड
 • डेबिट कार्ड
 • BHIM अँप
 • UPI पेमेन्ट

अशा अनेक पद्धतीने आपण फ्लिपकार्टवर वस्तू खरेदी करताना पैसे देऊ शकतो.

Flipkart वर आपल्या गरजांनुसार वस्तू कशी शोधावी ?

जेव्हा आपण आपल्या गरजांनुसार फ्लिपकार्ट वर काही वस्तू शोधत असतो तेव्हा फ्लिपकार्ट वर असंख्य वस्तू दाखवल्या जातात त्यामुळे आपण गोंधळात पडतो व आपल्याला समजत नाही कि कोणती वस्तू घ्यावी.

तुम्हाला जर तुमचा गरजांनुसार फ्लिपकार्ट वर एखादी गोष्ट शोधायची आहे तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल किंव्हा संगणकामधून फ्लिपकार्ट उघडा व जी वस्तू तुम्ही शोधत अहात तीच नाव टाकून शोधा.
 2. समोर असंख्य साम्य असणाऱ्या वस्तू समोर येतील, वस्तूंचा थोडे वर “Fillters” म्हणून पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
 3. “Fillters” वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर अनेक पर्याय निवडण्यासाठी येतील ते पर्याय तुम्ही तुमचा गरजांनुसार निवडू शकता, जसे कि वस्तूची किंमत किती असावी, वस्तू कोणत्या कंपनीची असावी, वस्तू किती मोठी असावी इत्यादी.
 4. आवश्यकतेनुसार सर्व पर्याय निवडल्यानन्तर apply बटनावर क्लिक करा. तुमचा समोर तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार वस्तू समोर येतील ज्यामुळे तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती सहजरित्या निवडू शकता.

अशा प्रकारे काही क्लीक्सने तुम्ही गोंधळून न जाता तुमचा आवश्यकतेनुसार वस्तू निवडू शकता.

Flipkart supercoins काय आहे ?

Flipkart सुपरकॉईन्स हे आपल्याला फ्लिपकार्ट वर ऑर्डर केल्यांनतर बक्षिसाचा स्वरूपात मिळतात. जेव्हा फ्लिपकार्ट प्लस वापरकरता 100 रुपयांची वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याला 4 सुपरकॉईन्स मिळतात त्याचप्रमाणे जेव्हा फ्लिपकार्ट प्लस नसलेला वापरकरता 100 रुपयांची वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याला 2 सुपरकॉईन्स मिळतात. यांचा वापर आपण फ्लिपकार्ट वर पुढील गोष्टी मिळवण्यासाठी करू शकतो :-

 • फ्लिपकार्ट प्लस मेम्बरशिप मिळवण्याची
 • वस्तूवर डिस्काउंट मिळवण्याची
 • वस्तूचे खरेदी केल्यांनतर तिचे पैसे देण्यासाठी
 • विमानेचे तिकीट बुक करण्यासाठी
 • विविध deals विकत घेण्यासाठी

अशा प्रकारे आपण सुपरकॉईन्सचा वापर अनेक ठिकाणी करू शकतो. परंतु या सुपरकॉईन्स ची वैद्यता एका वर्षा इतकी असते म्हणजेच जेव्हा तुम्हाला बक्षीसाच्या स्वरूपात सुपरकॉईन्स मिळतात ते त्या वेळेपासून पुढच्या 1 वर्षासाठीच वैद्य असतात.

Flipkart वर आपली आवडती भाषा कशी सेट करावी ?

अनेक फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना flipkart इंग्लिश भाषेत असल्यामुळे त्यांना वापरणे कठीण जाते. त्यामुळे flipkart ने त्यांची सुविधा आता 7 वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये देखील उपलब्ध केले आहे. फ्लिपकार्ट हे कन्नड, बंगाली, हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ आणि ओडिया अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे.

जर तुम्हालाही फ्लिपकार्ट ची भाषा इंग्रजी बदलून तुमची आवडती भाषा ठेवायची आहे का तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल किंव्हा संगणकामधून फ्लिपकार्ट उघडा व my account पर्यायावर क्लिक करा.
 2. my account पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर अनेक पर्याय येतील त्यातील खालचा बाजूस असणारे “Language settings” या पर्यायावर क्लिक करा.
 3. “Language settings” या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर 7 वेगवेगळ्या भाषा येतील त्यातील तुम्ही हवी ती भाषा निवडा व खाली केसरी रंगात असणाऱ्या “continue” बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही flipkart तुमच्या आवडत्या भाषेत वापरू शकता.

तर मित्रानो अशा प्रकारे आम्ही या “Flipkart बद्दल माहिती आणि Flipkart कसे वापरावे ?” लेखात फ्लिपकार्ट बद्दलची महत्वाची माहिती सांगितली आहे जी तुम्हाला फ्लिपकार्ट वापरताना नक्कीच मोलाची मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!