marathi mol

Google Chrome बद्दल संपूर्ण माहिती Google Chrome Information In Marathi

Google Chrome Information In Marathi मित्रहो Google chrome हे गुगल कडून तयार केले गेलेले वेब ब्राउझर आहे. Google chrome याची सुरुवात तेरा वर्षापूर्वी 2008 मध्ये झाली. Google chrome याचा शोध सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी लावला. Google chrome हि गुगल ची सुविधा मोबाईलसाठी आणि संगणकासाठी ॲप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे.

Google Chrome Information In Marathi

Google Chrome बद्दल संपूर्ण माहिती Google Chrome Information In Marathi

आजच्या काळात हे ॲप्लिकेशन विविध 47 भाषांमध्ये उपलब्ध आहे यामुळे याचा वापर संपूर्ण जगभर होत आहे. या एप्लीकेशन मध्ये आपण विविध सर्च इंजिनचा वापर करू शकतो, जसे की बिंग, याहू, गुगल. चला तर मग Google chrome हे कसे वापरावे ते जाणून घेऊया.

Google chrome एप्लीकेशन कसे सुरु करावे ?

मित्रांनो Google chrome सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपण जर अँड्रॉइड किंवा IOS वापरकर्ते असाल तर आपल्याला मोबाईल मधील ॲप स्टोअर मध्ये जाऊन, Google chrome हे ॲप्लिकेशन डाऊनलोड आणि इंस्टॉल करावे लागेल, जर तुम्ही संगणक किंवा लॅपटॉप वापर करते असाल तरीही तुम्हाला आपल्या डिवाइस मध्ये Google chrome हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.

Google chrome हे ॲप्लिकेशन गुगलचे असल्यामुळे याचा वापर सुरू करण्यासाठी आपण गुगल अकाउंट चा देखील वापर करू शकतो व जर तुमच्याकडे गुगलचे अकाउंट नसल्यास तुम्ही गुगलच्या अकाउंट शिवाय देखील Google chrome हे ॲप्लिकेशन सुरू करू शकता.

तर आपल्या डिवाइस मध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यावर ते कसे वापरावे हे पुढील लेखात जाणून घेऊ या.

Google chrome मध्ये सर्च इंजिन मध्ये सर्च कसे करावे ?

Google chrome ॲप्लिकेशन सुरू केल्यानंतर आपण तेथील सर्च इंजिन वर आपल्याला हव्या असणाऱ्या विविध गोष्टी शोधू शकतो, त्याबद्दल माहिती, विविध व्हिडिओ, विविध फोटो माहिती करून घेऊ शकतो.

जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल की Google chrome वर कसे सर्च करायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील किंवा संगणकामधील Google chrome हे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. Google chrome हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर एक पट्टी दिसेल ज्यामध्ये लिहिले असेल कि search or type web address, त्यावर क्लिक करा.
 3. Search or type web address यावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्च इंजिन वर जे शोधायचे आहे तेथे टाईप करा जसे की तुम्हाला पुरणपोळीच्या रेसिपी बद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तेथे पुरणपोळी रेसिपी असे टाइप करा.
 4. तुम्हाला जे शोधायचे आहे ते टाईप करून झाल्यानंतर, मोबाईल कीबोर्ड वरील किंवा संगणकाच्या की-बोर्ड वरील Enter या पर्यायावर क्लिक करा.
 5. Enter क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही शोधत असलेल्या माहिती विषयी सर्व रिझल्ट समोर येतील.

अशाप्रकारे मित्रांनो Google chrome मधील सर्च इंजिन चा वापर आपण आपले विविध सर्च करण्यासाठी करू शकतो व भरपूर काही माहिती जाणून घेऊ शकतो.

Google chrome मध्ये डेस्कटॉप साईट कशी ओपन करावी ?

मित्रांनो मोबाईलवरीळ Google chrome वर आपण आपले विविध काम करण्यासाठी मोबाइल साईटचा वापर करत असतो. परंतु काही वेळा आपल्याला काही कामासाठी, जसे एखादे फॉर्म भरण्यासाठी डेस्कटॉप साईट ची गरज असते, अशा वेळी आपण गुगल क्रोम मधील डेस्कटॉप साईट चा वापर करू शकतो, ज्या मुले आपण मोबाईल मध्ये संगणका सारखे माहिती पाहू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि गुगल क्रोम मध्ये डेस्कटॉप साईट कशी ओपन करावी तर पुढील प्रमाणे दिलेल्या स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील गुगल क्रोम चे ॲप्लिकेशन उघडा.
 2. गुगल क्रोम हे अप्लीकेशन उघडल्यानंतर, उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या लाल रंगाच्या गोलाकार बटणावर क्लिक करा.
 3. लाल रंगाच्या गोलाकार बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अनेक पर्यायांची लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये तुम्हाला Desktop site असे एक पर्याय दिसेल.
 4. त्या पर्यायांमध्ये असणाऱ्या Desktop site या पर्यायावर क्लिक करा.
 5. Desktop site या पर्यायावर क्लिक केल्यावर, हा पर्याय चालू होऊन जाईल व तुम्ही तुम्हाला हवी असणारी माहिती सर्च इंजिन मध्ये टाकून डेस्कटॉप साइटवर पाहू शकता.

अशाप्रकारे गुगल क्रोम ॲप्लिकेशन मध्ये आपण Desktop site साईट हा पर्याय चालू करू शकतो व त्याचा वापर करू शकतो.

Google chrome मध्ये Dark थीम कशी चालू करावी ?

मित्रांनो जसेकी आपल्याला माहीतच आहे की Dark थीम मुळे आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो, म्हणूनच गुगल क्रोम मध्ये देखील Dark थीम हे पर्याय आहे जे आपण चालू करू शकतो, ज्या मुले जर आपण हे ॲप्लिकेशन भरपूर वेळ वापरत असाल तर आपल्या डोळ्यांवर येणारा ताण Dark थीममुळे कमी होतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि गुगल क्रोम मध्ये Dark थीम कसे चालू करायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील गुगल क्रोम चे ॲप्लिकेशन उघडा.
 2. गुगल क्रोम हे अप्लीकेशन उघडल्यानंतर, उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या लाल रंगाच्या गोलाकार बटणावर क्लिक करा.
 3. लाल रंगाच्या गोलाकार बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अनेक पर्यायांची लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये तुम्हाला Settings हे पर्याय दिसेल.
 4. त्या पर्यायांमध्ये असणाऱ्या Settings या पर्यायावर क्लिक करा.
 5. Settings या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अनेक पर्याय येतील, तेथे Theme असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 6. Theme या पर्यायावर क्लिक तुमच्या समोर, तुम्हाला कोणती Theme ठेवायची आहे या बाबतीत विचारण्यात येईल, तेथे तुम्हाला Dark असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा व त्यातून बाहेर पडा.

अशाप्रकारे गुगल क्रोम या ॲप्लिकेशन मध्ये आपण Dark थीम चालू करू शकतो.

Google chrome मध्ये सर्च इंजिन कसे बदलावयचे ?

मित्रानो जेव्हा तुम्ही गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये किंवा संगणकामध्ये सुरू करता तेव्हा तुम्हाला या ॲप्लिकेशन कडून गूगल हे सर्च इंजिन ठेवलेले असते, जर तुम्हाला गुगल हे सचिन बदलावयाची असेल तर तुम्ही गुगल क्रोम मधील सेटिंग या पर्यायांमध्ये जाऊन बदलू शकता.

जर तुम्हाला गुगल क्रोम मध्ये सर्च इंजिन बदलायचे असेल तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील किंवा संगणकामधील गुगल क्रोम चे एप्लीकेशन उघडा.
 2. गुगल क्रोम हे अप्लीकेशन उघडल्यानंतर, उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या लाल रंगाच्या गोलाकार बटणावर क्लिक करा.
 3. लाल रंगाच्या गोलाकार बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अनेक पर्यायांची लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये तू मला Settings हे पर्याय दिसेल.
 4. त्या पर्यायांमध्ये असणाऱ्या Settings या पर्यायावर क्लिक करा.
 5. Settings या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अनेक पर्याय येतील, तेथे Search engine असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 6. Search engine या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला विविध प्रकारचे सर्च इंजिन्स दिसू येथील, तुम्ही तुम्हाला हवे असणारे सर्च इंजिन निवडू शकता.
 7. सर्च इंजिन निवडण्यासाठी विविध सर्च इंजिन च्या समोर क्लिक करण्यासाठी पर्याय असेल तर तेथे तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्च इंजिन वर क्लिक करू शकता.

अशाप्रकारे आपण गुगल क्रोम एप्लीकेशन मध्ये विविध प्रकारचे सर्च इंजिनचा वापर करू शकतो.

Google chrome सर्च हिस्ट्री कशी डिलीट करावी ?

मित्रहो, आपण सर्च एंजिन वर विविध माहिती शोधत असतो जी आपल्या सर्च इंजिन मध्ये जमा होत असते. आपण आपल्याला हवी असल्यास आपण शोधली गेलेली माहिती डिलीट करू शकतो.

जर तुम्हालाही तुमचे गुगल क्रोम मधील सर्चेस डिलीट करायचे असेल तर पुढील प्रमाणे स्टेट करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील किंवा संगणकामधील गुगल क्रोम चे एप्लीकेशन उघडा.
 2. गुगल क्रोम हे अप्लीकेशन उघडल्यानंतर, उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या लाल रंगाच्या गोलाकार बटणावर क्लिक करा.
 3. लाल रंगाच्या गोलाकार बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अनेक पर्यायांची लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये तू मला History हे पर्याय दिसेल.
 4. त्या पर्यायांमध्ये असणाऱ्या History या पर्यायावर क्लिक करा.
 5. History या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही केलेले सर्चेस दिसतील व त्याच्या वरच्या बाजूस Clear browsing data हे पर्याय दिसेल तेथे त्यावर क्लिक करा.
 6. Clear browsing data या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला काय काय डिलीट करायचे आहे, हे विचारण्यात येईल. तेथे तुमची सर्च हिस्ट्री निवडलेली असते म्हणून तुम्ही तेथील ओके बटनावर क्लिक करू शकता.

अशाप्रकारे आपण गुगल क्रोम मध्ये आपली सर्च केलेली गेली हिस्ट्री डिलीट मारू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात गुगल क्रोम एप्लीकेशन बद्दल माहिती सांगितली आहे. तसेच गुगल क्रोम एप्लीकेशन कसे वापरावे याबद्दल देखील सांगितले आहे जे तुम्हाला गूगल क्रोम हे ॲप्लिकेशन वापरताना नक्कीच मदत करेल. आम्ही लिहिलेला गुगल क्रोम बद्दलचा हा लेख तुम्हाला कसा वाटला एक खालील असल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!