marathi mol

Google Drive बद्दल संपूर्ण माहिती Google Drive Information In Marathi

Google Drive Information In Marathi मित्रानो Google ड्राईव्ह हे गूगलचे अँप्लिकेशन आहे, हे अँप्लिकेशन 24 एप्रिल 2012 मध्ये लाँच झाले. गूगलचे हे अँप्लिकेशन वीवीध प्रकारच्या फाइल्स साठवून ठेवण्यासाठी आहे. गूगल ड्राईव्ह हे वापरकर्त्यांसाठी 15 GB चे स्टोरेज फ्री मध्ये देते, जर एखाद्याला जास्त स्टोरेज हवे असल्यास त्याला त्यासाठी गूगलला मासिक चार्जेस द्यावे लागतात.

Google Drive Information In Marathi

Google Drive बद्दल संपूर्ण माहिती Google Drive Information In Marathi

आज या अँप्लिकेशन च वापर सम्पूर्ण जगभर मोठ्या प्रमाणात होत आहे. 2018 मधील रिपोर्ट नुसार गूगल ड्राईव्ह अँप्लिकेशनचे वापरकर्ते जवळपास 1 करोड इतके होते. गूगल ड्राईव्ह हे अँप्लिकेशन आणि संकेतस्थळ अशा दोन्ही सुविधेंमध्ये उपलब्ध आहे, पण आज आपण Goole drive चा अँप्लिकेशन बद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया Google ड्राईव्हचे अँप्लिकेशन कसे वापरावे.

Google drive अँप्लिकेशन कसे सुरु करावे ?

गुगल ड्राईव्ह चे ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी आपल्याकडे गुगलचे अकाउंट असणे गरजेचे असते. जर आपल्याकडे गुगल चे अकाउंट नसल्यास आपल्याला गुगल ड्राईव्ह सुरु करण्यासाठी सर्वप्रथम गुगलचे अकाउंट बनवावे लागेल. अकाउंट बनवल्यानंतर जर आपण अँड्रॉइड किंवा वापरकर्ते असाल तर आपल्या मोबाईल मधील ऍप स्टोअर ओपन करून तेथून गुगल ड्राईव्ह चे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा व नंतर ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये इंस्टॉल करा.

गुगल ड्राईव्ह चे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर एप्लीकेशन उघडा, अप्लीकेशन उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल अकाऊंट ची माहिती विचारली जाईल म्हणजेच, तेथे तुमच्या गुगल अकाउंट चे ई-मेल आयडी आणि पासवर्ड तेथे ती माहिती टाकून नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण आपल्या मोबाईल मध्ये गुगल ड्राइव्ह चे ॲप्लिकेशन सुरू करू शकतो.

Google drive मध्ये कोणतीही फाईल कशी अपलोड करावी ?

गुगल ड्राईव्ह मध्ये आपण आपल्या मोबाईल मधील फाईल्स अपलोड करू शकतो, ज्या मुले आपले मोबाईल ची स्पेस देखील जास्त भरत नाही. आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये फाईल अपलोड करण्यासाठी मोबाईल इंटरनेट ची गरज असते. गुगल ड्राईव्हच्या मदतीने आपण कधीही आपणास सेव करायची असणारी फाईल गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवू शकतो व गरज लागल्यास डाऊनलोड करून घेऊ शकतो. अशाप्रकारे आपण आपल्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या फाईल्स गुगल ड्राईव्ह मध्ये सुरक्षित ठेवू शकतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की गुगल ड्राईव्ह मध्ये विविध प्रकारच्या फाइल्स कश्या अपलोड कराव्यात तर पुढील दिलेल्या स्टेप्स करा.

 1. आपल्या मोबाईल मध्ये गूगल ड्राईव्ह चे एप्लीकेशन उघडा.
 2. अप्लीकेशन उघडल्यानंतर खालच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या अधिक च्या चिन्हावर क्लिक करा.
 3. अधिकच्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येतील, त्या पर्याय मधील अपलोड या पर्यायावर क्लिक करा.
 4. गुगल ड्राईव्ह मधील अपलोड पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमच्या मोबाईल मधील विविध प्रकारच्या फाइल्स समोरील येतील, तेथे तुम्हाला हवी असणारी फाइल्स त्यावर क्लिक करा.
 5. तुम्हाला अपलोड करायचे असणाऱ्या फाइलवर क्लिक केल्यावर ती फाईल गुगल ड्राईव्ह मध्ये येऊन अपलोड होण्यास सुरुवात होईल.

अशाप्रकारे आपण गुगल ड्राईव्ह मध्ये आपल्या मोबाईल मधील कोणतीही फाईल अपलोड करू शकतो आणि गुगल ड्राईव्ह च्या मदतीने आपल्या फाइल्स सुरक्षित ठेवू शकतो.

Google drive मध्ये विविध फोल्डर कसे तयार करावे ?

मित्रांनो आपण गुगल ड्राईव्ह मध्ये आपले विविध प्रकारचे महत्त्वाचे फाईल्स अपलोड करतो. आपल्या Google drive वर अपलोड केलेल्या फाइल्स विविध प्रकारच्या असल्यामुळे काही वेळेला आपणास हवी असणारी फाईल शोधताना गुंतागुंत होते व आपणास हवी असणारी फाईल शोधण्यास खूप वेळ जातो तर अशावेळी आपल्या विविध फाईल विविध फोल्डर्स मध्ये ठेवणे खूप फायदेशीर ठरते यासाठी आपण Google ड्राइव मध्ये फोल्डर देखील तयार करू शकतो, ज्यामध्ये आपल्या विविध फाईल वेगवेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करू शकतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल कि गुगल ड्राईव्ह मध्ये विविध फोल्डर कसे तयार करायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा.

 1. आपल्या मोबाईल मधील गुगल ड्राईव्ह चे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. एप्लीकेशन ओपन केल्यानंतर उजव्या बाजूने खालच्या कोपर्यात असणाऱ्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा.
 3. अधिकच्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही सहा विविध पर्याय येतील, तेथील Folder या पर्यायावर क्लिक करा.
 4. Folder पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुम्हाला जे फोल्डर बनवायचे आहे त्याचे नाव काय असावे याबद्दल विचारण्यात येईल, त्या पर्यायात तुम्ही तुम्हाला जे नाव ठेवायचे आहे ते टाईप करा.
 5. फोल्डर से नाव टाईप करून झाल्यानंतर उजव्या बाजुला असणाऱ्या Create या पर्यायावर क्लिक करा.

तर अशा प्रकारे आपण गुगल ड्राईव्ह मध्ये आपण विविध फोल्डर्स बनवू शकतो.

Google drive मध्ये अपलोड केलेले फाइल्स फोल्डर्स मध्ये कसे टाकावे ?

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल की तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड केलेले विविध प्रकारच्या फाइल्स तुम्ही तयार केलेल्या फोल्डर्स मध्ये कशा टाकाव्यात तर पुढीलप्रमाणे स्टेप्स करा.

 1. आपल्या मोबाईल मधील गुगल ड्राईव्ह चे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही तयार केलेले फोल्डर्स आणि तुम्ही अपलोड केलेल्या फाइल्स दिसतील.
 3. जी फाईव्ह तुम्हाला फोल्डर्स मध्ये टाकायचे आहे त्या फाईलच्या नावाच्या बाजूला असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 4. फाइलच्या नावाच्या बाजूला असणाऱ्या 3 बिंदूंवर वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अनेक पर्याय येतील.
 5. समोर आलेल्या पर्यायांमध्ये Move असे एक पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
 6. Move पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही तयार केलेले फोल्डर्स दिसतील, त्या फोल्डरमधील त्या फोल्डर वर क्लिक करा ज्या फोल्डरमध्ये तू मला ती फाईल टाकायची आहे.
 7. फॉल्डर वर क्लिक केल्यावर उजव्या बाजूस खालच्या कोपऱ्यात असणाऱ्या Move या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड केलेल्या विविध फाइल्स आपण तयार केलेल्या फोल्डरमध्ये टाकू शकतो, ज्या मुळे आपल्यास हवी असणारी फाईल गरजेच्या वेळेस लगेच मिळते.

Google drive मध्ये फाइल्स एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये कसे Move करावे ?

काही वेळेला आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये एखादी फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डरमध्ये टाकायची असते अशा वेळेला आपल्याला गुगल ड्राईव्ह येथील Move या पर्यायचा वापर करावा लागतो, ज्यामुळे आपण फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये टाकू शकतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की गुगल ड्राईव्ह मध्ये कोणतीही फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये कसे टाकायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स फॉलो करा.

 1. आपल्या मोबाईल मधील गुगल ड्राईव्ह एप्लीकेशन उघडा.
 2. एप्लीकेशन उघडल्यानंतर तेथे तुम्हाला ज्या फोल्डर मधून फाईल दुसऱ्या फोल्डर मध्ये टाकायची आहे त्या फोल्डर वर क्लिक करा.
 3. फोल्डर वर क्लिक केल्यानंतर जी फाईल तुम्हाला दुसऱ्या फोल्डरमध्ये टाकायची आहे त्या फाईलच्या नावाच्या बाजूला असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 4. तीन बिंदूंवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येथील त्यातील Move या पर्यायावर क्लिक करा.
 5. Move या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर गुगल ड्राईव्ह मधील तुम्ही तयार केलेले फोल्डर्स येतील, त्यातील त्या फोल्डरवर क्लिक करा ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला फाईल टाकायची आहे.
 6. फोल्डरवर क्लिक केल्यावर उजव्या बाजूला खालील कोपऱ्यात असणाऱ्या Move या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण गुगल ड्राईव्ह मध्ये कोणतीही फाइल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये टाकू शकतो

Google drive मध्ये save केली फाईल डाउनलोड कशी करावी ?

आपल्या गरजेनुसार आपण अनेक फाइल सुरक्षित ठेवण्यासाठी गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड करतो, आणि आपल्याच गरज असल्यास आपण ती फाईल गुगल ड्राईव्ह मध्ये ओपन करून सुद्धा पाहतो परंतु काही वेळेला आपल्याला ती फाईल डाऊनलोड करायची असते परंतु आपल्याला ती फाईल कशी डाऊनलोड करावी हे समजत नाही.

तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल की गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेली फाईल कशी डाउनलोड करावी तर पुढील प्रमाणे दिल्या गेलेल्या स्टेप्स करा.

 1. आपल्या मोबाईल मधील गुगल ड्राईव्ह एप्लीकेशन ओपन करा.
 2. एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर गुगल ड्राईव्ह मधील तयार केलेले फोल्डर्स आणि अपलोड केलेल्या फाइल्स येतील.
 3. तेथे तुम्हाला जी फाईल डाऊनलोड करायची आहे त्या फाईल च्या नावाच्या बाजूला असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 4. तीन उभ्या बिंदूंवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय येतील, तेथे Download असे एक पर्याय असेल.
 5. तेथे Download या पर्यायावर क्लिक करा, क्लिक केल्यावर तुम्हास हवी असणारी फाईल तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल.

अशाप्रकारे आपण गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेली कोणतीही फाईल गरजेच्या वेळेस अवघ्या काही सेकंदांमध्ये आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकतो.

Google drive मध्ये save केलेल्या फाईल चे नाव कसे बदलायचे ?

काही वेळेला आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये सेव केलेल्या फाइलचे नाव बदलायचे असते, अशा वेळेला आपण गुगल ड्राईव्ह मधील Rename या पर्यायाचा वापर करू शकतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेल्या फाईलचे नाव कसे बदलावे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा.

 1. आपल्या मोबाईल मधील गुगल ड्राईव्ह चे एप्लीकेशन ओपन करा.
 2. गुगल ड्राईव्ह एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही अपलोड केलेल्या फाइल्स दिसतील, तेथे ज्या फाइलचे नाव बदलायचे आहे त्या फाईलच्या नावाच्या बाजूला असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 3. तीन उभ्या बिंदूंवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील.
 4. समोर आलेल्या पर्यायांमध्ये Rename असे एक पर्याय असेल तर त्यावर क्लिक करा.
 5. Rename या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमच्या फाईलचे अगोदरचे असलेले नाव दिसेल तेथे तुम्ही ते नाव डिलीट करून तुम्हाला जे नाव ठेवायचे आहे ते तेथे टाईप करा.
 6. नवीन नाव टाईप केल्यानंतर उजव्या बाजूला असणाऱ्या Rename या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण गुगल ड्राईव्ह मध्ये सेव केलेल्या कोणत्याही फाइलचे नाव बदलू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात तुम्हाला Google drive म्हणजे याबद्दल थोडक्यात माहिती आणि Google drive कसे वापरावे याबद्दल माहिती सांगितली आहे, जी तुम्ही जर Google drive वापरकर्ते असाल तर तुम्हाला Google drive चे विविध पर्याय समजण्यास नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!