marathi mol

Google Keep बद्दल संपूर्ण माहिती Google Keep Information In Marathi

Google Keep Information In Marathi मित्रांनो Google Keep हे एक गुगलचे ॲप्लिकेशन आहे, जे नोट्स सेव्ह करण्यासाठी आहे. Google Keep आठ वर्षांपूर्वी 20 मार्च 2013 मध्ये सुरु झाले. गुगल ने सुरू केलेली ही सुविधा एप्लीकेशन आणि संकेतस्थळ अशा दोन्ही मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे मोबाईल वापरकर्ते आणि संगणक वापरकर्ते गुगल कडून असणाऱ्या या सुविधेचा वापर करू शकतात.

Google Keep Information In Marathi

Google Keep बद्दल संपूर्ण माहिती Google Keep Information In Marathi

Google Keep एप्लीकेशन मध्ये आपली महत्वाची माहिती सेव करू शकतो. चला तर मग या ॲप्लिकेशन बद्दल अधिक माहिती करून घेऊया.

Google Keep एप्लीकेशन कसे सुरु करावे ?

मित्रांनो Google Keep ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी, जर आपण अँड्रॉइड किंवा IOS मोबाईल वापर करते असाल तर आपल्या मोबाईल मधील ॲप स्टोर ला भेट देऊन तेथून Google Keep हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा व आपल्या मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा.

Google Keep हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यावर याचा वापर सुरू करण्यासाठी आपल्याकडे आपला गुगल अकाउंट असावा लागतो जर आपल्याकडे गुगल अकाउंट नसल्यास आपल्याला हे ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी गुगल अकाउंट तयार करावे लागेल. जर तुमच्याकडे गुगल अकाउंट असल्यास आपल्या मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले हे ॲप्लिकेशन उघडा व आपल्या गुगल अकाउंट ची माहिती टाकून स्टार्ट या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण Google Keep हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये सुरू करू शकतो. एप्लीकेशन तर सुरू झाले मात्र हे वापरावे कसे हे पुढे जाणून घेऊया.

Google Keep मध्ये नोट्स कशा तयार कराव्या ?

मित्रांनो आपण Google Keep एप्लीकेशन मध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेवू शकतो, ज्या आपल्या वेळेला लागल्यास आपण तेथून वाचू किंवा घेऊ शकतो. Google Keep मध्ये माहिती सेव्ह करण्यासाठी आपल्याला येथे नोट तयार करावी लागते, ज्यामध्ये आपली माहिती सेव्ह करू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि Google Keep मध्ये माहिती कशी सेव करावी तर पुढील दिलेल्या प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Google Keep एप्लीकेशन उघडा.
 2. अप्लीकेशन उघडल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला खालच्या कोपर्यात एक अधिकचे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 3. अधिकच्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला जी माहिती सेव्ह करायची आहे, ते टाकण्यासाठी काही पर्याय समोर येतील.
 4. तुमच्या समोर Title असे पर्याय असेल, तेथे तुम्ही टाकणारी माहिती कशाच्या बाबतीत आहे याबाबतीत थोडे नाव द्या, जसे की तुमचे शाळेतील एखाद्या विषया बाबतीत काही माहिती टाकायचे असल्यास तुम्ही Title चा ठिकाणी त्या विषयाचे नाव टाकू शकता.
 5. Title टाकल्यानंतर खाली Note असे पर्याय असेल तेथे तुम्ही तुम्हाला टाकायची असणारी माहिती तुम्ही तेथे टाईप करू शकता.
 6. Note मध्ये टाईप केलेली माहिती या एप्लीकेशन मध्ये आपोआप सेव्ह होत असते त्यामुळे तुम्हाला कोणत्याही सेव पर्यायावर क्लिक करण्याची गरज लागत नाही, आणि तुम्ही तुम्हाला टाकायचे असतानी माहिती टाकल्यानंतर तेथून बाहेर पडू शकता.

अशाप्रकारे आपण Google Keep मध्ये आपण महत्वाची असणारी माहिती सुरक्षित रित्या सेव्ह करून ठेवू शकतो.

Google Keep मध्ये फोटो कसे सेव्ह करावे ?

मित्रांनो आपण Google Keep मध्ये जशी महत्त्वाची माहिती सेव्ह करू शकतो त्याचप्रमाणे आपण या ॲप्लिकेशन मध्ये काही महत्त्वाचे असणारे फोटो देखील सेव्ह करून ठेवू शकतो व आपणास हव्या असल्यास आपण ते तेथून घेऊ शकतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की, Google Keep मध्ये फोटो कसे सेव करायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Google Keep एप्लीकेशन ओपन करा.
 2. Google Keep हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर जर तुम्ही अगोदर नोट्स तयार केले असतील तर तेथे दिसून येतील, तेथे तुम्ही उजव्या बाजूस खालील कोपऱ्यात असणाऱ्या अधिकच्या पर्यायावर क्लिक करा.
 3. अधिकच्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर नोट्स तयार करण्यासाठी रिकामे रखाणे येतील तेथे तुम्ही Title मध्ये तुमचे फोटो कशाच्या बाबतीत आहे हे तुम्ही हवे असल्यास टाकू शकता.
 4. Title टाकून झाल्यानंतर आता आपल्याला जे फोटो सेव करायचे आहे ते निवडावे लागेल त्यासाठी डाव्या बाजूवरील खालच्या कोपर्यात असणाऱ्या अधिकच या पर्यायावर क्लिक करा.
 5. अधिकच्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला नोट्स मध्ये काय ठेवायचे आहे याबाबतीत विविध पर्याय दाखवून विचारण्यात येईल तेथे तुम्ही Add Image या पर्यायावर क्लिक करा.
 6. Add Image वर क्लिक केल्यावर तुम्हाला जे फोटो मोबिलेमधून Google Keep मध्ये सेव करायचे आहे ते निवडण्यासाठी येईल, तेथे तो फोटो निवडा.
 7. फोटो निवडल्यानंतर तो नोट्स मध्ये येईल व आपोआप सेव होईल.

अशाप्रकारे आपण Google Keep मध्ये फोटो सेव्ह करून ठेवू शकतो.

Google Keep मध्ये Labels कसे तयार करावे ?

मित्रांनो Google Keep मध्ये आपल्या नोट्स नुसार विविध लेबल्स देखील तयार करू शकतो. लेबल्स म्हणजे थोडक्यात फोल्डर आपण आपल्या वेगवेगळ्या नोट्सचा विषयानुसार वेगवेगले लेबल्स तयार करू शकतो. ज्यामुळे आपल्याला आपण तयार केलेल्या वेगवेगळ्या नोट्स त्याच्या विषयानुसार लॅबेल्समध्ये ॲड करता येतात आणि शोधतानाही सहजता येते.

जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल की Google Keep मध्ये लेबल्स कसे तयार करावे तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Google Keep हे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. Google Keep चे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर, तुम्हला डाव्या बाजूला वरच्या भागात तीन आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक करा.
 3. तीन आडव्या रेषावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर काही पर्याय येथील, तेथे Create new label असे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 4. Create new label या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुम्हाला बनवायच्या असलेल्या लेबल चे नाव विचारण्यात येईल, तेथे तुम्हाला ठेवायचे असलेले लेबल चे नाव टाइप करा, जसे की तुम्हाला खेळाविषयी लेबल तयार करायचे असल्यास तुम्ही लेबल चे नाव स्पोर्ट्स असे ठेवू शकता.
 5. लेबल चे नाव टाईप केल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या बरोबर च्या खुणेवर (✓) क्लिक करा.
 6. बरोबर च्या खुणेवर क्लिक केल्यावर, तुम्हाला तयार करायचे असलेले लेबल तयार होऊन जाईल.

अशाप्रकारे तुम्ही Google Keep मध्ये तुमच्या नोट्स च्या विषयानुसार तुम्ही लेबल्स तयार करू शकता.

Google Keep मध्ये तयार केलेल्या विविध नोट्स Labels मध्ये कसे टाकावे ?

मित्रांनो Google Keep मध्ये आपण तयार केलेल्या विविध नोट्स त्या संबंधित असलेल्या लेबल्स मध्ये टाकू शकतो. लेबल्समुले आपल्याला प्रत्येक विषय संबंधित नोट्स वेगवेगळे ठेवता येतात, ज्या मुले जेव्हा कोणत्या Notes ची आपल्याला गरज लागते, तेव्हा आपण त्याला शोधताना गोंधळून न जाता त्याला ज्या लेबल मध्ये ऍड केले आहे त्या Label मध्ये जाऊन आपण शोधू शकतो.

जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल की तयार केलेल्या विविध नोट्स, त्याच्या विषयानुसार विविध लेबल मध्ये कसे ॲड करावे तर पुढील दिलेल्या प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाइलमधील Google Keep हे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. Google Keep हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तेथे तुम्हाला तुम्ही त्या एप्लीकेशन मध्ये तयार केलेल्या नोट्स दिसतील, तेथे त्या नोट वर क्लिक करा जिला तुम्हाला लेबल्स मध्ये ऍड करायचे आहे.
 3. नोट वर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर खालच्या आणि वरच्या बाजूस काही पर्याय दिसतील, तेथे खालच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 4. तीन उभ्या बिंदूंवर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर काही पर्याय येतील, तेथे खालच्या बाजूस तुम्हाला Labels असे एक पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
 5. Labels या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही तयार केलेल्या लेबल्स दिसून येतील, तिथे तुम्हाला निवडलेल्या नोट्स ज्या लेबल्स मध्ये टाकायची आहे त्या लेबल च्या समोर असणाऱ्या रिकाम्या बॉक्स वर क्लिक करा.
 6. लेबल्सच्या समोर असणाऱ्या रिकाम्या बॉक्स वर क्लिक केल्यावर, तुमची नोट्स त्याला लेबलमध्ये ऍड होऊन जाईल, व तुम्ही तेथून बाहेर पडू शकता.

अशाप्रकारे आपण Google Keep एप्लीकेशन मध्ये तयार केलेल्या विविध नोट्स त्या त्या विषयाच्या लेबल्स मध्ये टाकू शकतो.

अशा प्रकाराने मित्रहो आम्ही या लेखात Google Keep या मोबाईल एप्लीकेशन बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जे तुम्हाला तुम्ही Google Keep एप्लीकेशन वापरकरते असाल तर ते वापरण्यास नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!