marathi mol

Google Lens बद्दल संपूर्ण माहिती Google Lens Information In Marathi

Google Lens Information In Marathi मित्रानो Google Lens हे गूगल कंपनीचे मोबाइल अँप्लिकेशन आहे जे दिलेला फोटो बद्दल माहिती शोधण्यासाठी आहे. हे अँप्लिकेशन त्याला दिलेल्या फोटोला स्कॅन करते आणि त्यासंबंधित गूगलवर असणारे फोटो आणि त्याबद्दलची अनेक प्रकारची माहिती आपल्याला दाखवते, यामुळे जर आपल्यासमोर जर अनोळखी वस्तू असली आणि आपल्याला तिच्याविषयी माहिती करून घ्यायचे असेल तर, आपण Google lens चा मदतीने तिची माहिती शोधू शकतो. चला तर मग Google लेन्स बद्दल अधिक माहित करून घेऊया.

Google Lens Information In Marathi

Google Lens बद्दल संपूर्ण माहिती Google Lens Information In Marathi

Google lens चे फायदे :-

Google चा फोटो बद्दल माहिती शोधण्याच्या या Google lens अँप्लिकेशनचे खूप सारे फायदे आहेत.

Google lens चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

 • अनोळख्या गोष्टीचे उदाहरणार्थ एखाद्या नवीन असलेल्या झाडाचे फोटो काढून त्याबद्दल माहिती मिळवू शकतो.
 • एखाद्या अनोळख्या भाषेतील असणारी माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेत रूपांतर करून वाचू शकतो.
 • आपण अनोळख्या ठिकाणी आल्यास, आपण जेथे आहोत त्या ठिकाणाबद्दलची माहिती मिळवू शकतो.
 • तुमच्याकडे एखादी वस्तू आहे आणि तुम्हाला त्यासारखीच दुसरी वस्तू हवी असल्यास, अगोदरचा वस्तूचे फोटो Google lens ला दाखवल्यास ती वस्तू ऑनलाईन कुठे उपलब्ध आहे हे दाखवते.
 • याचा मदतीने आपण QR कोड त्याचप्रमाणे Barcode देखील स्कॅन करू शकतो.
 • पुस्तकावरील किंवा वहीवरील मजकूर Google लेन्स चा मदतीने मोबाईल मध्ये copy देखील करू शकतो.
 • Google lens ला एखाद्या जागेचा पत्ता दाखवल्यास ते आपल्याला तेथे जाण्याचा मार्ग देखील दाखवते.

अशाप्रकारे Google lens हे खूप फायदेशीर अँप्लिकेशन आहे, ज्यामुळे आपण अनेक काम फक्त एका अँप्लिकेशन मध्ये आणि अतिशय जलद करू शकतो.

Google Lens ने एखाद्या वस्तूची माहिती कशी मिळवावी :-

Google lens चा वापर करुण आपण एखाद्या अनोळख्या वस्त्तुची माहिती काढू शकतो. समजा आपल्या समोर एखादी वनस्पती आहे आणि आपण अगोदर तिला कधिच पाहील नाही, त्यामुळे तुम्हाला त्या वनस्पतीबद्दल काहींच माहिती नाही, तर या वेळी तुम्ही Google lens चा मदतीने त्या वनस्पती विषयीची सर्व माहिती शोधू शकता.

जर तुम्हाला समजायचे असेल कि Google लेन्स ने वस्तू विषयीची माहिती कशी शोधावी तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाईल मधील Google lens हे अँप्लिकेशन उघडा.
 • Google lens हे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमचा मोबाईलचा कॅमेरा सुरु होईल.
 • कॅमेरा सुरू झाल्यावर, ज्या वस्तू बद्दल तुम्हाला माहिती जाणून घायची आहे त्यासमोर कॅमेरा पकडा.
 • वस्तू समोर कॅमेरा पकडल्यावर मोबाइल स्क्रीन वर भिंगासारख्या दिसणाऱ्या shutter नावाचे बटन असेल त्यावर click करा.
 • भिंगासारख्या दिसणाऱ्या बटनावर क्लिक केल्यावर, तुमचा समोर google कडून अनेक प्रकारची माहिती, त्या वस्तूसारखे google वर असणारे फोटो समोर येतील.

अशाप्रकारे आपण अनोळख्या वस्तूची माहिती Google lens ने शोधु शकतो.

Google lens ने पुस्तकावरील किंवा वहीवरील मजकूर कॉपी कसा करायचा ?

काहीवेळा आपण वहीवर लेखन करतो आणि आपल्याला त्या लिहलेल्या मजकुरास मोबाईल वर एखाद्याला मेसेजने पाठवायचा असतो अशा वेळेला आपण Google lens चा वापर करून तो मजकूर काही सेकंदात मोबाईल मध्ये कॉपी करून एखाद्याला मेसेज ने पाठवू शकतो.

जर तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल कि Google lens ने वही कींवा मोबाईल वरील मजकूर कसा कॉपी करायचा तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाईल मधील Google lens हे अँप्लिकेशन उघडा.
 • Google lens हे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमचा मोबाईलचा कॅमेरा सुरु होईल.
 • कॅमेरा सुरू झाल्यावर, मोबाईल स्क्रीनवरील खालचा बाजूस असणारे Text या पर्यायावर क्लिक करा.
 • Text या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला ज्या पुस्तकावरील मजकूर मोबाइलमध्ये कॉपी करायचा आहे त्या मजकुरासमोर आपल्या मोबाइलचा कॅमेरा व्यवस्थितरीत्या पकडा.
 • मजकुरा समोर आपल्या मोबाइलचे कॅमेरा पकडल्यावर, स्क्रीनवरील गोलाकार आकारात पांढऱ्या रंगामध्ये असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
 • पर्यायावर क्लिक केल्यावर, खाली असणाऱ्या select all या पर्यायावर क्लिक करा.
 • Select all या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही कॅमेरा मध्ये घेतलेला सर्व मजकूर सिलेक्ट होईल.
 • मजकूर सिलेक्ट झाल्यांनतर खाली असलेल्या Copy text या पर्यायाचा वापर करून तुम्ही मजकूर कॉपी करू शकता.

अशाप्रकारे Google lens चा वापर करून आपण आपल्या वहीवरील किंव्हा पुस्तकावरील मजकूर मोबाईल मध्ये कॉपी करू शकतो.

Google lens ने अनोळख्या भाषेतील मजकूर आपल्या भाषेत कसा ट्रान्सलेट करायचा :-

आपल्या समोर अनेकदा अनोळख्या भाषेतील न्युसपेपर किंव्हा पोस्टर येतात जे आपल्याला ती भाषा येत नसल्यामुळे आपल्याला ते वाचणे आणि त्याचे अर्थ समजने कठीण जाते, अशावेळेला आपण ते Google lens चा वापर करून सहजरित्या वाचू शकतो व अर्थही समजून घेऊ शकतो.

जर तुम्हाला माहित करून घायचे असेल कि Google lens ने अनोळख्या भाषेतील मजकुर कसा ट्रान्सलेट करायचा तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या अँड्रॉइड किंव्हा आयोस मोबाईल मधील Google lens हे अँप्लिकेशन उघडा.
 • Google lens हे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमचा मोबाईलचा कॅमेरा सुरु होईल.
 • कॅमेरा सुरू झाल्यावर, मोबाईल स्क्रीनवरील खालचा बाजूस असणारे Text या पर्यायावर क्लिक करा.
 • Text या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला ज्या पुस्तकावरील मजकूर translate करायचा आहे त्या मजकुरासमोर आपल्या मोबाइलचे कॅमेरा व्यवस्थितरीत्या पकडा.
 • मजकुरासमोर आपल्या मोबाइलचे कॅमेरा पकडल्यावर, स्क्रीनवरील गोलाकार आकारात असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
 • स्क्रीन वरील पर्यायावर क्लिक केल्यावर, खाली असणाऱ्या select all या पर्यायावर क्लिक करा.
 • Select all या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्ही कॅमेरा मध्ये घेतलेला सर्व मजकूर सिलेक्ट होईल.
 • मजकूर सिलेक्ट झाल्यांनतर खाली असलेल्या Translate या पर्यायावर क्लिक करा.
 • Translate या पर्यायवर क्लिक केल्यावर, तुम्ही निवडलेला मजकूर भाषांतर होईल, तेथे तुम्ही हवी ती भाषा निवडून त्या भाषे मध्ये तो मजकूर translate करू शकता.

अशाप्रकारे आपल्या समोर कोणत्याही भाषेतील लेख आल्यास, आपण त्याला आपल्याला समजणाऱ्या भाषेत भाषांतर करून वाचू आणि समजू शकतो.

Google lens ने बारकोड किंव्हा QR कोडे कसे स्कॅन करायचे ?

आपल्याला अनेकदा कंपनीकडून वस्तू खरेदी केल्यावर त्यावर बार कोड (Barcode) किंव्हा QR कोड दिला जातो, त्या कोड मध्ये आपल्या खरेदि विषयीची माहिती असते. या बारकोड किंव्हा QR कोड ना आपण Google लेन्स ने स्कॅन करून त्यातील असणारी माहिती मिळवू शकतो.

जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल कि Google lens चा मदतीने बार कोड (Barcode) किंव्हा QR कोड कसा स्कॅन करायचा तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या अँड्रॉइड किंव्हा आयोस मोबाईल मधील Google lens हे अँप्लिकेशन उघडा.
 • Google lens हे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमचा मोबाईलचा कॅमेरा सुरु होईल.
 • तुमचा समोर असणाऱ्या बार कोड (Barcode) किंव्हा QR कोड वर मोबाइलचा कॅमेरा पकडा.
 • बार कोड (Barcode) किंव्हा QR कोड वर मोबाइलचा कॅमेरा पकडल्यावर, तुमचा समोर असणाऱ्या गोलाकार पर्यायावर क्लिक करा.
 • स्क्रीनवरील गोलाकार पर्यायावर क्लिक केल्यावर, मोबाइल स्क्रीनवरील खालचा बाजूस तुम्हाला Copy text हे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • Copy text या पर्यायावर क्लिक केल्यावर, बार कोड (Barcode) किंव्हा QR कोड मधील असणारा मजकूर कॉपी होईल, तो तुम्ही मोबाईल मधील नोटपॅड मध्ये पेस्ट करून वाचू शकता.

अशाप्रकारे आपण Google lens चा वापर करून बार कोड (Barcode) किंव्हा QR कोडमधील असणारा मजकूर पाहू शकतो.

Google lens ने तुमचा समोर असणाऱ्या वस्तूसारखी वस्तू कशी खरेदी करावी ?

अनेकदा आपल्या समोर अनेक सुंदर वस्तू येतात ज्याना पाहून आपल्याला वाटते कि या सारखी वस्तू आपल्याकडे देखील हवी, जसे कि कपडे, शोभेच्या वस्तू, उपकरणे इत्यादी. अशा वेळेला आपण Google lens चा वापर करून त्या सारखीच वस्तू कुठे उपलब्ध आहे हे पाहून ती वस्तू विकत घेऊ शकतो.

जर तुम्हालाही तुम्ही पाहिलेल्या वस्तू सारखीच वस्तू कशी शोधावी आणि खरेदी करावी हे समजायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाइल मधील Google lens हे अँप्लिकेशन उघडा.
 • Google lens चे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर, google lens मधील कॅमेरा सुरु होईल, तेथे स्क्रीन खालचा बाजूस Shopping असे पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
 • Shopping पर्यायावर क्लिक केल्यावर, कॅमेरा समोर जी वस्तू तुम्हाला खरेदी करायचे आहे तिच्यावर मोबाईल चे कॅमेरे पकडा व खाली असणाऱ्या मोठ्या गोलाकार बटनावर क्लिक करा.
 • बटनावर क्लिक केल्यावर, त्या वस्तू सारख्या वस्तू अनेक वेबसाईट मधून समोर येतील, तेथे क्लिक करून तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही पाहिलेल्या वस्तू सारखीच वस्तू खरेदी करायची असल्यास आपण Google lens चा वापर करू शकतो.

अशाप्रकारे आम्ही या “Google Lens बद्दल माहिती आणि Google lens कसे वापरावे ?” लेखात Google लेन्स बद्दलची काही महत्वाची माहिती सांगितली आहे, जी तुम्ही जर Google lens वापरकर्ते असाल तर तुम्हाला खूप उपयोगी ठरेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!