marathi mol

Google Meet बद्दल संपूर्ण माहिती Google Meet Information In Marathi

Google Meet Information In Marathi मित्रानो Google meet हे गूगल कडून वापरकर्त्यांना मिळणारी सर्विस आहे. Google meet हे ऑनलाईन मीटिंग साठी बनविलेली सर्विस आहे. याचा वापर करून आपण घरबसल्या मीटिंग घेऊ शकतो. Lockdown लागल्यापासून जगामध्ये सर्व ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरु झाले आणि सर्व शाळा, महाविद्यालय बंद होऊन ऑनलाईन सुरु झाले, या काळात तर Google मीटचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला.

Google Meet Information In Marathi

Google Meet बद्दल संपूर्ण माहिती Google Meet Information In Marathi

सर्व शाळेतील शिक्षक घरी बसून Google meet चा मदतीने विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि सर्व कर्मचारी घरी बसून आपल्या मिटींग्स Google मीटवर घेऊन आपले काम करीत होते. Google मीट हे android आणि IOS वापरकर्त्यांसाठी अँप्लिकेशन मध्ये आणि संगणक आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी वेबसाईट मध्ये उपलब्ध आहे. चला तर मग Google meet बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.

Google meet चे फायदे :-

Google meet हे ऑनलाईन मीटिंग साठी असणारे खूप फायदेशीर अँप्लिकेशन आहे. त्याचप्रमाणे हे वापरण्यास देखील खूप सोप्पे आहे.

Google meet चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

 1. Voice calling साठी वापरू शकतो.
 2. व्हिडिओ कॉलिंग साठी वापरू शकतो.
 3. शिक्षक घरबसल्या एकावेळेस भरपूर विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.
 4. यातील chat पर्यायामुळे शिकवताना काही शन्का असल्यास विद्यार्थी शिक्षकांना विचारू शकतात.
 5. कंपनीतील त्याचप्रमाणे अणेक कार्यालयातील कर्मचारी Google meet चा वापर करून मीटिंग घेऊन एकमेकांशी चर्चा करू शकतात.
 6. हि मोफत सुविधा आहे आणि याचा वापर करून आपण अमर्यादित मीटिंग घेऊ शकतो.
 7. Google मीट हे सर्व अँड्रॉइड, IOS आणि लॅपटॉप, संगणकावर वापरू शकतो.
 8. एका वेळेला 100 जण एक मीटिंग जॉईन करू शकतात.

अशाप्रकारे Google Meet हे त्याचा विविध फायदेशीर पर्यायामुळे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

Google मीट कसे सुरु करावे ?

Google meet सुरु करण्यासाठी जर तुम्ही अँड्रॉइड किव्हा IOS वापरकर्ते असाल तर आपल्या मोबाइल मधील अँप स्टोअर मध्ये जाऊन Google meet हे अँप्लिकेशन डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा आणि जर तुम्ही कॉम्पुटर किव्हा लॅपटॉप वापरकर्ते असाल तर ब्राउसर उघडून गूगल मध्ये Google मीट असे शोधा, तुमचा समोर पहिली लिंक येईल त्यावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण Google meet सुरु करू शकतो.

Google meet मध्ये खाते कसे खोलावे ?

Google Meet हे गूगल कंपनीचे असल्यामुळे google मीट सुरु करण्यासाठी Gmail अकाउंट असणे गरजेचे आहे. Google Meet आपल्या gmail अकाउंट वरील माहितीच वापर मीटिंग साठी करतो म्हणजेच जे नाव आपल्या gmail अकाउंट ला ठेवलं आहे तेच ते मीटिंग साठी देखील वापरतो.

अशाप्रकारे जेव्हा आपण गूगल मीट सुरु करतो तेव्हा Gmail अकाउंट चे ई-मेल आयडी आणि पासवर्ड विचारेल, तेथे आपले Gmail आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

अशाप्रकारे आपल्याला Google meet च वापर करण्यासाठी वेगळं खाते तयार करण्याची गरज पडत नाही. आपल्या असणाऱ्या Gmail अकाउंट च वापर करून Google मीट सुरु करून त्यावरील सर्व पर्यायांचा वापर करू शकतो.

कॉम्पुटरमध्ये किव्हा लॅपटॉप मध्ये Google meet कसे वापरावे ?

कॉम्पुटरमध्ये किव्हा लॅपटॉपमध्ये Google मीट सुरु केल्यावर, तेथे अणेक पर्याय असतात जे नवीन वापरकर्त्यास समजणे कठीण जाते व त्यामुळे त्यांना मीटिंग सुरु करणे किंव्हा मीटिंग जॉईन करणे अवघड जाते.

तुम्ही जर कॉम्पुटर किव्हा लॅपटॉप वापरकर्ते असाल तर पुढीलप्रमाणे Google मीट चा वापर करा :-

Meeting कशी जॉईन करावी How to join google meet :-

जेव्हा आपली ऑनलाईन मीटिंग Google मीट वर असते तेव्हा आपल्या मीटिंग होस्ट कडून मीटिंग चा कोड किंव्हा लिंक येते, त्यावेळी काहींना नवीन असल्यामुळे मीटिंग जॉईन करणे जमत नाही.

जर तुम्हाला Google meet चा मदतीने Meeting जॉईन करायची असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या कॉम्पुटरमधे किव्हा लॅपटॉपमधे गूगल मीट उघडा व Enter a code or link या पर्यायावर क्लिक करा.
 2. तुम्हाला मीटिंग होस्ट कडून आलेला मीटिंग चा कोड किंव्हा लिंक Enter a code or link या पर्यायात टाका.
 3. मीटिंग कोड किंव्हा लिंक Enter a code or link या पर्यायात टाकल्यानन्तर बाजूला असलेल्या Join या पर्यायावर क्लिक करा.
 4. Join या पर्यायावर क्लिक केल्यावर Sign in करण्यासाठी तुमचा समोर Gmail अकाउंट चे ई-मेल आयडी आणि पासवर्ड विचारेल ते टाका.
 5. Sign in केल्यांनतर आपण मीटिंग जॉईन होऊ.

अशाप्रकारे आपण कॉम्पुटरमधे किव्हा लॅपटॉपमधे Google मीट ने मिटिंग जॉईन करू शकतो.

Google meet मध्ये Meeting कशी तयार करावी How to create google meet meeting :-

जर तुम्हाला कॉम्पुटरमधे किव्हा लॅपटॉपमधे Google meet वर मीटिंग तयार करायची असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या कॉम्पुटरमधे किव्हा लॅपटॉपमधे गूगल मीट उघडा व निळ्या रंगात असणाऱ्या New meeting या पर्यायावर क्लिक करा.
 2. New meeting या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर तीन पर्याय येतील.
 3. त्या तीन पर्यायमधील Start an instant meeting वर क्लिक करा.
 4. Start an instant meeting वर क्लिक केल्यावर तुमचा समोर Sign in करण्यासाठी तुमचा समोर Gmail अकाउंट चे ई-मेल आयडी आणि पासवर्ड विचारेल ते टाका.
 5. Sign in केल्यावर, मीटिंग सुरु होईल व तुमचा समोर मीटिंग चा कोड हा मिटिंगचा members ना शेअर करण्यासाठी पर्याय येईल, तेथून तो कोड आपल्या meeting चा members ना पाठवा.

अशा प्रकारे आपण कॉम्पुटरमधे किव्हा लॅपटॉपमधे Google meet वर मीटिंग तयार करू शकतो.

Meeting साठी कॅमेरा कसा चालू करावा How to turn on camera on google meet ?

जर तुम्हाला Google meet वर मीटिंग करायची असेल आणि तुम्हाला मीटिंगला कॅमेराची गरज लागणार असेल तर कॅमेरा चालू करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

 1. गूगल मीट सुरु करा किंवा मिटिंग जॉईन करा.
 2. Google meet जॉईन केल्यांनतर मीटिंग सुरु होईल.
 3. मिटिंग सुरु झाल्यावर कीबोर्ड वरील Ctrl आणि E बटणे एकसोबत दाबा.
 4. Ctrl आणि E एकसोबत दाबल्यानन्तर तुमचा google मीट मधला कॅमेरा चालू होईल आणि तुम्ही बाकी मीटिंग members ना दिसू लागाल.

अशाप्रकारे आपण Google meet मध्ये मीटिंग साठी कॅमेरा चालू करू शकतो.

Meeting साठी माइक कसा चालू करावा How to on microphone in google meet ?

जर तुम्हाला Google meet वर मीटिंग करायची असेल आणि तुम्हाला मीटिंग दरम्यान माइकची गरज लागणार असेल तर माइक चालू करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

 1. गूगल मीट सुरु झाल्यावर किव्हा मिटिंग जॉईन करा.
 2. Google meet जॉईन केल्यांनतर मीटिंग सुरु होईल.
 3. मिटिंग सुरु झाल्यावर कीबोर्ड वरील Ctrl आणि D एकसोबत दाबा.
 4. Ctrl आणि D एकसोबत दाबल्यानन्तर तुमचा google मीट मधला माइक चालू होईल आणि तुमचा आवाज बाकी मीटिंग members ऐकू शकतील.

अशाप्रकारे आपण Google meet मध्ये मीटिंग साठी माईक चालू करू शकतो.

Google meet मध्ये Screen कशी प्रेसेंट करावी :-

Google meet मधील स्क्रीन प्रेसेंट हे खूप महत्वाचे पर्याय आहे. या पर्यायाच्या मदतीने आपण घरबसल्या ऑनलाइन प्रेसेंटेशन किव्हा इतर अनेक काम करू शकतो. पण अनेक Google वापरकर्त्यांना या पर्यायाबद्दल माहीतच नसते.

जर तुम्हालाहि माहित करून घ्यायचे असेल कि Google meet वरील Present screen या पर्यायाचा वापर कसा करावा तर पुढील स्टेप्स करा :-

 1. गूगल मीट सुरु करा किव्हा मिटिंग जॉईन करा.
 2. Google meet जॉईन केल्यांनतर मीटिंग सुरु होईल.
 3. मिटिंग सुरु झाल्यावर स्क्रीनवरील खालचा बाजूस ५ पर्याय दिसतील त्यातील मधल्या चौकोन असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
 4. मधल्या चौकोन असणाऱ्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर तीन पर्याय येतील जे तुम्हाला विचारतील कि तुम्हाला पूर्ण लॅपटॉप किंव्हा कॉम्पुटर ची स्क्रीन प्रेसेंट करायची आहे का, ब्रॉवसर ची window प्रेसेंट करायची आहे का, tab प्रेसेंट करायची आहे का. तेथे तुमचा गरजेनुसार कोणत्याही पर्यायावर क्लिक करा.
 5. येणाऱ्या 3 पर्यायांपैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला खात्री करण्यासाठी विचारण्यात येईल, तेथे share वर क्लिक करा.
 6. Share वर क्लिक केल्यावर तुमची निवडलेली स्क्रीन इतर मीटिंग members ना दिसू लागेल.

अशाप्रकारे आपण Google meet वर प्रेसेंट स्क्रीन पर्यायचा वापर करून आपली लॅपटॉप किंव्हा कॉम्पुटर स्क्रीन इतरांना शेअर करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या “Google Meet बद्दल माहिती आणि Google Meet कसे वापरावे ?” लेखात Google meet बद्दलची माहिती सांगितली आहे, जी तुम्हाला Google मीटचे वापर करताना नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!