marathi mol

आरोग्य विमाबद्दल संपूर्ण माहिती Health Insurance In Marathi

Health Insurance In Marathi आरोग्य विमा योजनेमध्ये विमा कंपनी पॉलिसीधारकाला आजारपणामध्ये होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी कवच प्रदान करते व या बदल्यात विमाधारकाला ठराविक रक्कम प्रीमियमच्या स्वरूपात ठराविक कालावधीपर्यंत भरावी लागते.

Health Insurance In Marathi

आरोग्य विमाबद्दल संपूर्ण माहिती Health Insurance In Marathi

या लेखामध्ये आरोग्य विमा योजना, याचे फायदे तसेच यामधील विविध प्रकार व आरोग्य विमा कंपन्या यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली आहे.

आरोग्य विमा :-

आरोग्य विमा हा विमाधारक व्यक्ती व विमा कंपनी यांच्यामध्ये घडून येणारा करार आहे ज्यामध्ये विमा कंपनी मर्यादित कालावधीसाठी विमाधारक व्यक्तींना विविध वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक कवच उपलब्ध करून देते. या बदल्यात विमाधारक व्यक्तीला ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक हप्त्याच्या स्वरूपात भरावी लागते विमाधारकाला मिळणारे हे आर्थिक कवच हे विविध योजनांनुसार अंशतः किंवा पूर्ण स्वरूपात वैद्यकीय खर्चाची पूर्तता करते.

आरोग्यविमा प्रदान करणारी कंपनी विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्था, हॉस्पिटल तसेच स्पेशालिस्ट डॉक्टर्स यांच्यासोबत करार करते. त्यामुळे जर विमाधारक व्यक्तीने विमा कंपनीशी संलग्न असलेल्या डॉक्टर किंवा हॉस्पिटल मधून वैद्यकीय सेवा घेतल्यास त्यासाठी विमाधारकाला कमी खर्च करावा लागते तसेच काही मूलभूत सुविधा उदाहरणार्थ रूटीन चेकअप, चाचण्या ह्या विमा कंपनी मोफत उपलब्ध करून देते.

याव्यतिरिक्त काही योजनांमध्ये विमाधारक विमा कंपनीशी संलग्न नसलेल्या डॉक्टर कडून आरोग्य सेवा घेता येते.

आरोग्य विमा ही सुविधा विमाधारकाला आपत्तीच्या वेळी अमर्याद वैद्यकीय खर्चाचा भार सांभाळण्यासाठी मदत करते.

आरोग्य विमा योजनेचे विविध प्रकार :-

आरोग्य विमा योजना मुख्यतः 5 योजनांमध्ये वर्गीकृत केली जाते.

 1. हेल्थ मेंटेनन्स ऑर्गनायझेशन (HMO’s)
 2. एक्सक्लुझिव्ह प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन (EPO’s)
 3. प्रेफर्ड प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन (PPO’s)
 4. पॉईंट ऑफ सर्विस प्लान (POS)
 5. हाय डिडक्टीबल हेल्थ प्लॅन (HDHP’s)

चला प्रत्येक योजनेबद्दल संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया.

1) हेल्थ मेंटेनन्स ऑर्गनायझेशन (HMO’s) :-

यामध्ये प्राथमिक चिकित्सक (primary care provider) हा या योजनेचा केंद्र मानला जातो. या योजनेअंतर्गत विमा कंपनी अशा अनेक प्राथमिक चिकित्सकांशी करार करते. प्राथमिक वैद्यकीय चिकित्सक (PCP) हे मुख्यतः बालरोगतज्ञ फॅमिली डॉक्टर, व इतर सामान्य चिकित्सक असतात.

ते साधारणतः रूटीन चेकअप, साधारण चाचणी अशा वैद्यकीय सेवा विमाधारकांना प्रदान करतात. या योजनेमध्ये विमाधारक व्यक्ती विमा कालावधीमध्ये कितीही वेळा प्राथमिक वैद्यकीय चिकित्सकाकडुन प्राथमिक तपासणी करवून घेऊ शकतो.

या योजनेसाठी विमाधारकाला इतर योजनांच्या तुलनेने कमी रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते. यामध्ये विमाधारकाला वैद्यकीय सेवेसोबत औषधांसाठीही कमी खर्च करावा लागतो. तसेच या योजनेमध्ये प्राथमिक वैद्यकीय चिकित्सकाकडून रेफरल मिळवून तज्ञ डॉक्टरांना भेट देता येते. हे तज्ञदेखील साधारणतः विमा कंपनीशी संलग्न असतात. त्यामुळे या योजनेमध्ये विमा कंपनीशी संलग्नित नसलेल्या तज्ञांकडून आपल्याला वैद्यकीय सेवा मिळवता येत नाही.

2) एक्सक्लुझिव्ह प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन (EPO’s) :-

या योजनेमध्ये विमा कंपनी अनेक विशेषज्ञ डॉक्टर्स व हॉस्पिटलसोबत करार करते.

या योजनेमध्ये सुद्धा पॉलिसीधारकाला विमा कंपनीशी संलग्नित असलेल्या वैद्यकीय चिकित्सकांकडूनच वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. याव्यतिरिक्त इतर तज्ञांकडून किंवा डॉक्टरांकडून पॉलिसीधारकाला पॉलिसीअंतर्गत आरोग्यसेवा घेता येत नाही. फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमा कंपनी इतर डॉक्टरांकडून घेतलेल्या वैद्यकीय सेवेसाठी सवलत उपलब्ध करून देते.

तसेच या योजनेमध्ये तज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी पॉलिसीधारकाला प्राथमिक वैद्यकीय चिकित्सकाच्या रेफरलची आवश्यकता भासत नाही. या योजनेमध्ये असणारे प्रीमियमची रक्कम मध्यम स्वरूपाची असते.

3) प्रेफर्ड प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन (PPO’s) :-

या योजनेमध्येदेखील विमा कंपनी अनेक डॉक्टर्स, तज्ञ व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसोबत करार करते. विमाधारक व्यक्तीने विमा कंपनीच्या नेटवर्कमधील तज्ञांकडून किंवा हॉस्पिटल मधून आरोग्यसेवा घेतल्यास विमाधारकाला आरोग्यसेवेसाठी कमी खर्च करावा लागतो.

तसेच जर पॉलिसीधारक व्यक्तीने पॉलिसी नेटवर्कमध्ये नसणाऱ्या तज्ञाकडून वैद्यकीय सेवा घेतल्यास त्याला जास्त खर्च करावा लागतो. याव्यतिरिक्त पॉलिसीधारक व्यक्ती इतर ठिकाणी प्रवास करत असल्यास तिथल्या डॉक्टर किंवा तज्ञाकडून पॉलिसी अंतर्गत इलाज करून घेऊ शकतो.

तसेच तज्ञ डॉक्टरांना भेट देण्यासाठी विमाधारक व्यक्तीस रेफरलची आवश्यकता भासत नाही. इतर योजनांच्या तुलनेत यामध्ये भराव्या लागणाऱ्या मासिक प्रीमियमची रक्कम जास्त असते.

4) पॉईंट ऑफ सर्विस प्लान (POS) :-

या योजनेमध्ये विमाधारक व्यक्तींना जवळपास असणाऱ्या प्राथमिक वैद्यकीय चिकित्सक निवडावा लागतो. तसेच या योजनेमध्ये विमाधारक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार योग्य वाटणाऱ्या वैद्यकीय चिकित्सकाकडे उपचार घेऊ शकतो. तसेच आपल्याला नेटवर्कमध्ये असणारा किंवा नेटवर्कमध्ये नसलेल्या तज्ञाकडूनही वैद्यकीय सेवा घेता येते. पण नेटवर्कमध्ये नसणाऱ्या डॉक्टर व्हिजीटसाठी पॉलिसीधारकाला जास्त खर्च करावा लागतो तसेच आरोग्य पॉलिसीचा वापर करण्यासाठी पॉलिसीधारकाला स्वतः कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

ही योजना HMOs व PPO’s या योजनांना एकत्र करून तयार केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत तज्ञ डॉक्टरांना भेट देण्यासाठी प्राथमिक वैद्यकीय चिकित्सकाच्या रेफरलची आवश्यकता भासते.

5) हाय डिडक्टीबल हेल्थ प्लॅन (HDHP’s) :-

या योजनेमध्ये पॉलिसीधारकाला विमा कंपनीकडे डिडक्टीबल रक्कम जमा करावी लागते व यानंतरच विमा कंपनी पॉलिसीधारकाला विमा कवच प्रदान करते.

यामध्ये विमा कंपनी विमाधारकाला प्राथमिक चाचण्या, तपासणी, रूटीन चेकअप यासारख्या सेवा मोफत देते. पण इतर वैद्यकीय सेवांमध्ये होणारा खर्च हा पॉलिसीधारकाने भरलेल्या डिडक्टीबल रकमेतून केला जातो. पॉलिसीधारकाने जमा केलेली रक्कम संपल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी विमा कंपनी खर्च करते.

या योजनेमध्ये प्रीमियमची रक्कम कमी असते तर डिडक्टीबल म्हणून जास्त रक्कम भरावी लागते.

आरोग्य विमाद्वारा मिळणारे फायदे :

आरोग्य विमाद्वारे विमाधारक व्यक्तीला मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

 • वैद्यकीय उपचार पद्धतीसाठी पॉलिसीधारकाला आर्थिक कवच प्रदान करते
 • काही पॉलिसी अंतर्गत प्राथमिक तपासणी, प्राथमिक चाचण्या अशा उपचारपद्धती मोफत दिल्या जातात.
 • आरोग्यासंदर्भातील आपत्तीचा सामना करताना पॉलिसी धारकाच्या बचतीचे संरक्षण करते
 • विमाधारक व्यक्तीला दुर्धर आजारासाठी आवश्यक असणाऱ्या उपचार पद्धतींना विमाकंपनी कव्हर करते.
 • ही योजना आपले व आपल्या कुटुंबियांचे महागडी उपचारपद्धती असणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करते
 • वैद्यकीय महागाईपासून आपले संरक्षण करते
 • तसेच विमाधारकाला प्राप्तिकर कायद्याअंतर्गत करलाभ मिळवता येतो.

आरोग्य विमामध्ये वापरले जाणाऱ्या विविध संज्ञा :

आरोग्य विमा योजनेमध्ये मुख्यतः पुढील संज्ञांचा वापर केला जातो. आरोग्य विमा पॉलिसी बद्दल जाणून घेण्यासाठी या संज्ञांचा अर्थ जाणून घेणे गरजेचे असते.

अ) पॉलिसीधारक /विमाधारक (insured person) :- आरोग्य विमामध्ये ज्या व्यक्तीला आरोग्य कवच दिले जाते त्या व्यक्तीला पॉलिसीधारक असे म्हणतात.
ब) विमा कंपनी (policy provider) :- विमा कंपनी पॉलिसीधारक व्यक्तीला प्रीमियमच्या बदल्यात पॉलिसी कव्हर देते.
क) प्राथमिक चिकित्सक ( primary care physician) :- प्राथमिक चिकित्सक पॉलिसीधारकाला प्राथमिक तपासणी चाचणी इत्यादी सुविधा देतात. तसेच तज्ञ डॉक्टरांची भेट दघेण्यासाठी पॉलिसीधारकाला प्राथमिक चिकित्सकाच्या रेफरलची आवश्यकता भासते.
ड) प्रीमियम (premium) :- विमा सुरक्षेच्याबदल्यात पॉलिसीधारकाला मासिक किंवा त्रैमासिक स्वरूपात भराव्या लागणाऱ्या रकमेला प्रीमियम असे म्हणतात.
ई) विमा कालावधी (Term) :- विमा कंपनी अर्जदाराला ठराविक कालावधीसाठी विमा संरक्षण देते, म्हणून या कालावधीला विमा कालावधी असे म्हणतात.

आरोग्य विमामध्ये कव्हर न होणाऱ्या उपचारपद्धती :

काही ठराविक आजार व उपचार पद्धती सोडल्यास बाकी उपचार पद्धतींचा आरोग्य विमा योजनेमध्ये समावेश होतो. आरोग्य विमा योजनेमध्ये कव्हर न होणाऱ्या उपचार पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

 • काही नॉन ऍलोपॅथिक उपचार पद्धती आरोग्य विभागामध्ये कव्हर केल्या जात नाहीत
 • गरोदरपणातील उपचार पद्धती
 • मद्यपान धूम्रपान अशा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून आरोग्य विमा संरक्षण देत नाही
 • सौंदर्यवर्धक शल्यक्रियांचासुद्धा आरोग्य विमामध्ये समावेश होत नाही
 • लैंगिक संक्रमणामुळे होणारे आजार उदा. एड्स
 • स्वतः जाणीवपूर्वक केलेली दुखापत जसे की आत्महत्येचा प्रयत्न यांचा समावेश आरोग्य विमामध्ये होत नाही.

आरोग्य विमा सुविधा प्रदान करणाऱ्या विमा कंपन्या :

भारतामध्ये अनेक विमा कंपन्या ग्राहकांना आरोग्य विमाच्या विविध योजना ग्राहकांना उपलब्ध करून देतात. यातील महत्त्वाच्या असणाऱ्या काही कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

 1. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स
 2. बजाज आलियांज हेल्थ इन्शुरन्स
 3. डिजिट हेल्थ इन्शुरन्स
 4. केअर हेल्थ इन्शुरन्स
 5. कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स
 6. भारतीय एक्सा हेल्थ इन्शुरन्स
 7. चोलामंडल हेल्थ इन्शुरन्स
 8. फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स
 9. मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स
 10. एडेलवेईस हेल्थ इन्शुरन्स
 11. मनिपलसिग्ना हेल्थ इन्शुरन्स
 12. लिबर्टी हेल्थ इन्शुरन्स

अशाप्रकारे आरोग्य विमासेवा ही ग्राहकांना आजारपणामध्ये उद्भवणार्या वैद्यकीय महागाईपासून संरक्षण करते व विमाधारकांना कमी खर्चात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते. तसेच आरोग्य विम्यामुळे विमाधारकाचे व त्याच्या कुटुंबाचे आरोग्यासंदर्भातील आपत्तींपासून संरक्षण होते.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!