marathi mol

महावितरण App बद्दल संपूर्ण माहिती MahaVitaran App In Marathi

MahaVitaran App In Marathi मित्रानो Mahavitaran हे महाराष्ट्र राज्याचे विदयुत वितरण करणाऱ्या कंपनीचे अँप्लिकेशन आहे. महावितरणचे हे अँप्लिकेशन वीज वापरकर्त्यांसाठी आहे. हे अँप्लिकेशन फक्त महाराष्ट्रातील वीज वापरकर्त्यांसाठी आहे. याचा वापर आपण अनेक कार्यांसाठी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या अँप्लिकेशन बद्दल आणि ते कसे वापरावे.

MahaVitaran App In Marathi

महावितरण App बद्दल संपूर्ण माहिती MahaVitaran App In Marathi

Mahavitaran अँप कसे सुरु करावे ?

जर तुम्ही अँड्रॉइड मोबाइल वापरत असाल तर, Mahavitaran चे अप्लिकेशन playstore वर उपलब्ध आहे, तुम्ही तेथे जाऊन डाउनलोड करा व डाउनलोड केल्यांनतर इन्स्टॉल करा.

महावितरण चे अँप्लिकेशन Download केल्यांनतर, या अँप्लिकेशन मोबाइल मधील camera वापरण्याची परमिशन लागते त्यासाठी तुम्ही मोबाइल सेटीन्ग्स मध्ये जाऊन Mahavitran अँप्लिकेशन साठी कॅमेरा परमिशन चालू करा.

Mahavitran अँप मध्ये अकाउंट कसे open करावे ?

Mahavitran चे अँप डाउनलोड केल्यांनतर महत्वाची पायरी म्हणजे Mahavitran अँप वर खाते तयार करणे. Mahavitran अँप वर खाते तयार केल्यांनतर आपण त्यातील सर्व सेवांचा वापर करू शकतो.

जर तुम्हालाही Mahavitran अँप वर खाते तयार करायचे आहे तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Mahavitran चे अँप्लिकेशन उघडा, तुमचा समोर Log in name आणि password टाकण्यासाठी पर्याय येतील व त्याच खाली “Don’t have account? Sign up” असं पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
 2. “Don’t have account? Sign up” वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर काही गोष्टी विचारण्यात येतिल जसे कि Consumer नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, लॉग इन नाव आणि पासवर्ड इत्यादी, या सर्व गोष्टी भरा व खाली निळ्या रंगात असणाऱ्या Submit बटनावर क्लिक करा.
 3. अशाप्रकारे Sumbit बटणवर क्लिक केल्यांनतर तुम्हाला स्क्रीन वर दाखवण्यात येईल कि तुमची रेजिस्ट्रेशन process पूर्ण झाली आहे, आणि तुम्ही आपोआप लॉग इन page वर याल तेथे तुम्ही अकाउंट ओपन करण्याच्या वेळी वापरलेला लॉग इन नाव आणि पासवर्ड टाका व खालील Login बटनावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण Mahavitran अँप्लिकेशन वर खाते तयार करू शकतो.

Mahavitran अँप मधील विविध वैशिष्ट्ये :-

Mahavitran अँप्लिकेशन हे वापरकर्त्यांसाठी असल्यामुळे यात भरपूर फीचर्स आहेत . Mahavitran मधील काही फीचर्स पुढीलप्रमाणे आहेत :-

 • महिन्याची होणारी मीटर रिडींग पाठवू शकतो.
 • आपले मासिक बिल किती आले ते पाहू शकतो.
 • आपले मासिक वीज बिल घरबसल्या महावितरण अँप्लिकेशनवर भरू शकतो.
 • आपल्या घरातील होणाऱ्या विजेच्या खपानुसार येणारे बिल मोजू शकतो.
 • विजेचे नवीन connection साठी apply करू शकतो.
 • विजेच्या बाबतीत काही तक्रार असल्यास Mahavitran अँप वर नोंदवू शकतो.
 • आपले नवीन मोबाईल नंबर update करू शकतो.
 • आपल्या शेजारी वीज चोरी होत असल्यास आपण Mahavitran अँप वर तसे कळवू शकतो.
 • महावितरणच्या नजदिकचे कार्यालय शोधू शकतो.

अशा प्रकारे Mahavitran अँप चे खूप फायदे आहेत.

Mahavitran अँप मार्फत मीटर रिडींग कशी पाठवावी ?

मित्रानो आपण Mahavitran अँप मार्फत कंपनीस आपली मासिक मीटर रिडींग सुद्धा पाठवू शकतो. हि मीटर रिडींग आपल्याला महिन्याच्या 11 ते 15 तारखे दरम्यान पाठवावी लागते.

जर तुम्हालाही Mahavitran अँप चा मदतीने मीटर रिडींग पाठवायची असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील महावितरणचे अँप्लिकेशन उघडा व समोर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातील “Submit meter reading” या पर्यायावर क्लिक करा.
 2. “Submit meter reading” वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचा मीटरचे रिडींग दिसत असतानाचे फोटो टाकायला पर्याय असते तेथे क्लिक करून मीटरचे रिडींग दिसताना फोटो टाका.
 3. मीटरचे फोटो टाकल्यानन्तर तुम्हाला खाली मीटर रिडींग अंकाच्या स्वरूपात टाकण्यासाठी पर्याय असेल तेथे मीटर रिडींग टाका व खाली असणाऱ्या Submit बटनावर क्लिक करा.
 4. Submit बेटांवर क्लिक केल्यावर तुम्हाला खात्री करण्यासाठी पर्याय येईल तेथे Ok वर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण दर महिन्याला Mahavitran अँप च्या मदतीने मीटर रिडींग submit करू शकतो.

Mahavitaran आप मध्ये विजेचे बिल कसे पाहावे ?

मीटर रिडींग दिल्यानन्तर Mahavitaran अँप वर आपण दर महिन्याचे येणारे बिल सुद्धा बघु शकतो. ते कसे बघावे यासाठी पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाइल मधील Mahavitaran अँप उघडा, तुमचा समोर अनेक पर्याय दिसतील त्यातील View/Pay bill या पर्यायावर क्लिक करा.
 2. View/Pay bill या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचा कोणत्या consumer नंबरचे बिल बघायचे आहे हे विचारण्यात येईल, तेथे तुम्हाला हव्या त्या consumer नंबरवर क्लिक करा.
 3. Consumer नंबर वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचे मासिक वीज येईल.

अशाप्रकारे आपण Mahavitran अँप्लिकेशन चा वापर करून आपले मासिक वीज बिल पाहू शकतो.

Mahavitran आप मध्ये विजेचे बिल कसे भरावे ?

Mahavitran अँप्लिकेशन चा वापर करून आपण लांबलचक रांगेत वीजबिल भरण्यासाठी उभे न राहता घरबसल्या भरू शकतो.

तुम्हालाही तुमचे विजेचे बिल Mahavitran अँप चा मदतीने भरायचे असल्यास पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाइल मधील Mahavitran अँप उघडा, तुमचा समोर अनेक पर्याय दिसतील त्यातील View/Pay bill या पर्यायावर क्लिक करा.
 2. View/Pay bill या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचा कोणत्या consumer नंबरचे बिल बघायचे आहे हे विचारण्यात येईल, तेथे तुम्हाला हव्या त्या consume नंबरवर क्लिक करा.
 3. Consumer नंबर वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचे मासिक वीज येईल, तेथे खाली निळ्या रंगात असणारऱ्या Pay Bill पर्यायावर क्लिक करा.
 4. Pay Bill पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर काही terms अँड conditions दाखवल्या जातील तेथे I agree या पर्यायावर क्लिक करा.
 5. I agree या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर payment करण्यासाठी अनेक पर्याय दिसतील, त्यातील तुम्ही हव्यात्या पर्यायाचा वापर करून पेयमेन्ट करा व खाली निळ्या रंगात असणाऱ्या Pay now पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण Mahavitran अँप्लिकेशनचा वापर करून घरबसल्या वीज बिल भरू शकतो.

Mahavitran अँप मध्ये तक्रार कशी नोंदवावी ?

महावितरण अँप वर आपण घरामध्ये, घराबाहेर किंव्हा घरासमोरील विजेच्या पोळवर विजेचे काही समस्या असल्यास आपण महावितरण अँप्लिकेशन चा मदतीने तक्रार नोंदवू शकतो.

तुम्हालाही महावितरण अँप्लिकेशन वर तक्रार नोंदवायची असल्यास पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाइल मधील Mahavitran अँप उघडा, तुमचा समोर अनेक पर्याय दिसतील त्यातील Complaints या पर्यायावर क्लिक करा.
 • Complaints या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुम्ही महावितरणच्या अँप मध्ये जोडलेले connection समोर दिसतील त्यातील Consumer नंबर वर क्लिक करा.
 • Consumer नंबर वर क्लिक केल्यांनतर, तुम्हाला विचारण्यात येईल कि तुम्हाला नवीन तक्रार नोंदवायची (Register new) आहे कि अगोदरचा तक्रारीची माहिती (Track existing) घायची आहे, तेथे Register New या पर्यायावर क्लिक करा.
 • Register New या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर consumer ची माहिती दाखविण्यात येईल, तेथे Next पर्यायावर क्लिक करा.
 • Next पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर एक फॉर्म येईल, त्या फॉर्म मध्ये काही गोष्टी विचारण्यात येतील जसे कि तुमचं गाव, पत्त्याची खून, मोबाईल नंबर, आणि काय तक्रार आहे, हि सर्व माहिती टाकल्यानन्तर खाली निळ्या रंगात असणाऱ्या Submit बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण Mahavitran अँप्लिकेशन वर तक्रार नोंदवू शकतो.

Mahavitran अँप मधून वीज चोरी बद्दल कसे कळवावे ?

आज अनेक ठिकाणी विजेची चोरी होत आहे, अशा परिस्थितीत आपण जर आपल्या माहितीत कुठे विजेची चोरी होत असेल तर आपण महावितरण अँप वर ते कळवू शकतो.

तुम्हालाहि जर विजेची होणारी चोरी कळवायची असल्यास पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाइल मधील Mahavitran अँप उघडा, तुमचा समोर अनेक पर्याय दिसतील त्यातील Report power theft या पर्यायावर क्लिक करा.
 2. Report power theft या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर एक फॉर्म येईल तेथे काही गोष्टी विचारल्या असतील जसे कि ठिकाण, पुरावा, फोटो इत्यादी, तर तेथे सर्व माहिती भरा व खाली असणाऱ्या Submit बेटांवर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण Mahavitran अँप्लिकेशन चा मदतीने विजेची होणारी चोरी कळवू शकतो.

Mahavitran अँप मधून वीज बिलचे हिशोब कसे लावावे ?

Mahavitran अँप्लिकेशन हे अतिशय उत्तम सुविधा आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या घरातील किव्हा कार्यालयातील होणारा विजेचा वापर आणि त्यानुसार येणारे विजेचे बिल मोजू शकतो. या पर्यायामुळे आपल्याला घरातील किंव्हा कार्यालयातील होणाऱ्या विजेचे वापर समजते ज्यामुळे आपल्याला वीजेचे कमी वापर करण्यास मदत होते.

 1. आपल्या मोबाइल मधील Mahavitran अँप उघडा, तुमचा समोर अनेक पर्याय दिसतील त्यातील Bill calculator या पर्यायावर क्लिक करा.
 2. Bill calculator या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर काही पर्याय येतील जसे कि तुम्ही घरात कोणते उपकरणे वापरता, किती वेळ वापरता, उपकरणे किती आहेत इत्यादी. हि सर्व माहिती टाका ज्यामुळे आपणास आपल्या घरातील किव्हा कार्यालयातील होणारा विजेचा वापर आणि त्यामुळे येणारे विजेचे बिल समजते.

अशाप्रकारे आपण mahavitran अँप्लिकेशनचा मदतीने आपल्या घरातील किव्हा कार्यालयातील होणारा विजेचा वापर मोजू शकतो.

अशाप्रकारे मित्रानो आम्ही या लेखात Mahavitran अँप्लिकेशन बद्दल माहिती सांगितली आहे जी तुम्हाला Mahavitran चे अँप्लिकेशन वापरण्यास नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!