marathi mol

Instagram वरून पैसे कसे कमवायचे ? How To Make Money On Instagram In Marathi

Make Money On Instagram In Marathi नमस्कार मित्रानो, आपण मोबाईल आणि लॅपटॉपवर इंटरनेटचा सतत वापर करीत असतो आणि आपल्याला माहितीच आहे की आपण या इंटरनेट वरून कमवू देखील शकतो. इंटरनेट वरून पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत, जेथून आपण घरबसल्या खूप पैसे कमवू शकतो. आज आपण या अनेक मार्गामधील एका मार्गाबद्दल समजनार आहोत ते म्हणजे इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे.

Make Money On Instagram In Marathi

Instagram वरून पैसे कसे कमवायचे ? How To Make Money On Instagram In Marathi

आजकाल आपण आपल्या आसपास पाहिले तर प्रत्येकाने आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टाग्राम इंस्टॉल केले आहे आणि दिवसातील खूप वेळ ते इंस्टाग्राम वर व्हिडिओस, फोटोस बघत घालवीत असतात, तर अशा वेळेला आपन त्यात गुंतून राहतो आणि त्यातून आपण पैसे कमवू शकतो हे समजतच नाही आणि आपण त्यामागे आपला वेळ देखील वाया घालवतो.

अशा वेळेला आपल्याला याचा फायदा घेतला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे या पद्धतीसाठी कोणत्याही गुंतवणूकीची आवश्यकता नाही, हि पद्द्त पूर्णपणे विनामूल्य आणि कायदेशीर आहे कारण आपल्याला हे काम सुरु करण्यासाठी आपल्याला फक्त मोबाईल आणि त्यावर फक्त इंस्टाग्राम अँप्लिकेशन डाउनलोड करून sign up करावे लागते. चला तर मग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

इंस्टाग्राम म्हणजे काय?

इंस्टाग्राम ही एक सोशल मीडिया वेबसाइट ज्याचा शोध केविन सिस्ट्रोमयांनी लावला आहे आणि याची सुरवात ६ ऑक्टोबर २०१० मध्ये झाली. आज इंस्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी केला गेला जातो. इंस्टाग्राम हे वेबसाईट आणि अँप्लिकेशन्स अशा दोन्ही मध्ये उपलब्ध आहे.

दररोज मोठ्या प्रमाणावर अनेकजण इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओस शेअर करीत आहेत आणि त्यांतील ज्यांना जास्त लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या त्यावर त्यांना आनंद मिळतो. म्हणजेच आज बहुतेक लोकांना इन्स्टाग्रामचा फायदा माहित नाही की आपण इन्स्टाग्राम वरून कमवू देखील शकतो.

इन्स्टाग्राम वरून पैसे कमवण्याचे मार्ग:-

इंस्टाग्रामवरून कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत, ज्याने आपण खूप पैसे कमवू शकतो.

इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्याचे काही महत्वाचे पर्याय पुढीलप्रमाणे आहेत :-

1) अँफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
2) स्पॉन्सर पोस्ट (Sponsored Post)
3) इन्स्टाग्राम खाते विक्री (Instagram account Sale)
4) इतर इंस्टाग्राम खात्याचा प्रचार करा (Promotion of another Instagram Account)
5) स्वतःची वस्तू विका (Sell your Product)

1) अँफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) :- अँफिलिएट मार्केटिंग म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला आपल्या इंस्टग्राम अकाउंटचा नीचनुसार म्हणजेच विषयानुसार एखादे अँफिलिएट प्रोग्रॅम जोडावे लागते.

अँफिलिएट प्रोग्रॅम जोडल्यानन्तर, आपल्याला त्यांचा वस्तूची advertise आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर करावी लागते आणि त्यांच्या वस्तूची अँफिलिएट लिंक आपल्या इंस्टाग्राम अकाउंट मधील बायो मध्ये टाकावी लागते ज्यामुळे आपल्या इंस्टाग्राम फॉलोवर्सना ती वस्तू घ्यायची असल्यास ते आपल्या अँफिलिएट लिंक मधनं जाऊन घेतील व आपल्याला त्याच अँफिलिएट कमिशन मिळेल.

आपल्याला आपल्या इंस्टाग्रामवर नेहमी योग्य हॅशटॅग वापरून पोस्ट मधून, स्टोरी मधून, व्हिडिओ मधून अँफिलिएट वस्तू ची जाहिरात करावी लागते. इंस्टाग्रामवर product संबंधित पोस्ट शेअर करा आणि पोस्टचा खाली योग्य हॅशटॅग आणि त्याचप्रमाणे कॉल टू डायरेक्शन म्हणजेच तेथे नमूद करा की जर तुम्हाला वस्तू खरेदी करण्यात रस असेल तर तुम्ही बायो मधील दिलेल्या लिंकवर क्लिक करून घेऊ शकता.

जर कुणाला वस्तू घ्यायची असेल तर ते तुमच्या बायोमधील दिलेल्या अँफिलिएट लिंक मधून वस्तू घेतील आणि तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल.

2) स्पॉन्सर पोस्ट (Sponsored Post) :- स्पॉन्सर पोस्ट या पद्धतीमध्ये आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर खूप followers असतील तर आपल्याला कंपनीकडून पैसे घेऊन त्यांच्या सर्विसिविषयी किंव्हा वस्तू विषयी पोस्ट टाकण्यासाठी ऑफर येते. ज्यामध्ये आपल्याकडे जर खूप followers असतील तर आपण कंपनीचे पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करून पैसे कमवू शकतो. परंतु आपल्याकडे जर पुरेसे फोल्लोवर्स नसतील तर आपल्याला पोस्ट टाकून, रील्स टाकून आपले genuine फोल्लोवर्स वाढवावे लागतील.

3) इन्स्टाग्राम खाते विक्री (Instagram account Sale) :- जर तुमच्याकडे खूप इन्स्टाग्राम खाते आहेत आणि त्या खात्यावर खूप काही फोल्लोवेर्स असतील तर तुम्ही तुमचे इन्स्टाग्राम खाते ज्याला इंस्टाग्राम अकॉउंट ची गरज आहे त्याला विकुण पैसे कमवू शकतो. आज मोठया प्रमाणात अनेकजण इंस्टाग्राम अकाउंट grow करून आणि त्यांना विकून पैसे कमवित आहेत.

4) इतर इंस्टाग्राम खात्याचा प्रचार करा (Promotion of another Instagram Account) :- या पददथी मध्ये जर तुमच्याकडे अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स असतील तर आपोआपच इतर इन्स्टाग्राम वापरकर्ते तुमच्या स्टोरीवर किंव्हा पोस्टमध्ये त्यांच्या खात्याची माहिती शेअर करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधतील जेणेकरून तुमचे फोल्लोवेर्स त्याला देखील फॉलो करतील.
या पद्धतीमध्ये इतर इन्स्टाग्राम वापरकर्ते आपल्या स्टोरीवरील किंव्हा पोस्टमध्ये त्यांच्या खात्याची माहिती शेअर करण्यासाठी आपल्याला पैसे देतात.

5) स्वतःची वस्तू विका (Sell your Product) :- हि एक आजकाल मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्द्त आहे. या पद्तीमध्ये आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तू विकू शकतो जसे कि मूर्तिकार अनेक शोभेच्या मुर्त्या बनवून आणि इन्स्ट्राग्रामवर त्याचे मार्केटिंग करून विकू शकतो. या पद्धतीमध्ये आपल्याकडे आपला quality product असणे गरजेचं आहे.

अशाप्रकारे आपण वरील ५ पद्धतींचा वापर करून इंस्टाग्रामवरुन घरबसल्या आणि गुंतवणूकीशिवाय पैसे कमवू शकतो.

इन्स्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाठी स्टेप्स :-

जर तुम्ही इंस्टाग्रामवरून पैसे कमावण्यास तयार असाल तर इंस्टाग्राम वरून तुमची कमाई सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स कराव्या लागतील :-

1) ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड आहे ते विषय (Niche) निवडा

मित्रांनो, आधी तुम्हाला एक Niche निवडावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला आवड असेल कारण जर ते Niche तुमच्या आवडीचे असेल तर तुम्ही त्या संबंधित product ची चांगल्यारितीने मार्केटिंग करू शकाल.

2) Niche संबंधित अँफिलिएट प्रोग्रॅम जोडा

मित्रहो Niche निवडल्यानंतर, आपल्याला आपल्या niche शी संबंधित अँफिलिएट प्रोग्रॅम जोडावे लागेल, त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करा, तेथे तुमचा niche शी संबंधित अँफिलिएट प्रोग्रॅम शोधा व त्यांचा वेबसाईट वर भेट देऊन तेथे त्यांचा affiliate बनण्यासाठी रजिस्टर करा. आज मार्केटमध्ये मध्ये खूप अँफिलिएट प्रोग्रॅम आहेत जे products ची सेल्स वाढविण्यासाठी affiliate marketers च्या शोधात आहेत.

3) इन्स्टाग्राम व्यवसाय खाते उघडा:-

तुम्ही ठरवलेल्या niche नुसार business इन्स्टाग्राम अकाउंट उघडा, यासाठी आपल्याला आपला ई-मेल आयडी, मोबाइल नंबर वापरावा लागतो. जर आपल्याकडे आपला फेसबुक अकाउंट असल्यास, आपण तो देखील इंस्टाग्राममध्ये लॉग इन करण्यासाठी वापरू शकतो. इंस्टाग्राम अकाउंट चे username निवडताना असा निवड जे तुमचा Niche चा संभंधित असेल, ज्यामुळे फक्त username मुळे नवीन लोकांना तुमचा Niche बद्दल माहित समजण्यास देखील मदत होते.

4) आकर्षित इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करा :-

इंस्टाग्राम अकाउंट तयार केल्यांनतर, व्यवस्थितरित्या सर्व माहिती भरून आपली इंस्टाग्राम प्रोफिईल पूर्ण करा. इंस्टाग्राम प्रोफाइल मध्ये आपल्या प्रोडक्ट विषयी किंव्हा Nich विषयी सर्व माहिती टाका ज्यामुळे जेंव्हा फोल्लोवर्स तुमची इंस्टग्राम प्रोफाईल बघतील तेव्हा त्यांना तुम्ही मार्केटिंग करत असलेल्या वस्तू विषयी थोडक्यात माहिती समजेल.

5) नियमितपणे Niche किंवा Product संबंधित पोस्ट आणि रील्स शेअर करा :-

इंस्टाग्राम अकाउंट ओपन केल्यांनतर व सर्व प्रोफाईल सेट केल्यांनतर तुम्हाला नियमितपणे योग्यरीत्या हॅशटॅग्स चा वापर करून niche किंवा product संबंधित पोस्ट आणि रील्स शेअर करावी लागते, मग थोड्या कालांतराने तुमच्या niche आणि product मध्ये इंटरेस्ट असलेले लोक तुमच्या खात्याला follow करण्यास सुरुवात करतील आणि अशाप्रकारे तुम्ही मार्केटिंग करत असलेल्या वस्तूची विक्री सुरू होईल.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे याबाबदल माहिती सांगितली आहे, जी तुम्हाला घरबसल्या पैसे कमविण्यास आणि तुमचा business इंस्टाग्राम वर सुरु करण्यास मदत करेल. जर आम्ही लिहलेला हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करा.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!