Marathi Language Day Essay In Marathi चला तर मित्रांनो आज मी आपल्या मराठी भाषेचा गौरव करणार आहोत , म्हणजेच आपल्या मराठी भाषेबद्दल निबंध लिहिणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल मराठी भाषा गौरव दिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
मराठी भाषा गौरव दिन वर मराठी निबंध Marathi Language Day Essay In Marathi
महाराष्ट्र राज्य म्हणजेच मराठी भाषिकांचे राज्य या आपल्या राज्यात अनेक महान थोर संत होऊन गेलेले आहेत. या राज्याला संतांची नगरी किंवा संतांची जन्मभूमी म्हटले जाते. इथे संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , संत तुकाराम महाराज यासारखे अनेक संत या राज्याला लाभले.
याप्रमाणेच अनेक महान कवी, लेखक सुद्धा या मराठी मायभूमीत जन्म घेतले. मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण दरवर्षी २७ फेब्रुवारीला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा करतो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.
मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.
‘लीळाचरित्र’ हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेच़ा पाया रोवला. आज़वर एक लाख पुस्तके प्रकाशित झ़ाली आहेत. त्यांतली हज़ारभर तरी जागतिक साहित्यांत स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हज़ार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, आणि छोटीमोठी अडीच़शे साहित्य संमेलने भरतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका कवितेत मराठी भाषेचे कौतुक केले आहेत :-
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
तर मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन वर मराठी निबंध तुम्हाला जरूर आवडला असेलच , धन्यवाद .
हे सुद्धा अवश्य वाचावे :-
- शिक्षक वर मराठी निबंध
- वर्तमानपत्र वर मराठी निबंध
- पैसे वर मराठी निबंध
- माझा छंद वर मराठी निबंध
- संगीत वर मराठी निबंध
- मराठी भाषा दिन वर घोषवाक्य