marathi mol

Pinterest बद्दल संपूर्ण माहिती Pinterest Information In Marathi

Pinterest Information In Marathi मित्रानो Pinterest हे फोटो शेअर करण्यासाठी असलेले अँप्लिकेशन आहे ज्याच्या मदतीने वापरकर्ते एकमेकांना फोटो पाठवू शकतात. Pinterest चा शोध डिसेंबर 2009 मध्ये इव्हान शार्प, पॉल सियारा, बेन सिलबर्मन यांनी लावला. Pinterest हि एक अमेरिकेन कंपनी आहे आणि यातील बरेचसे वापरकरर्ते हे USA मधले आहेत.

Pinterest Information In Marathi

Pinterest बद्दल संपूर्ण माहिती Pinterest Information In Marathi

अनेक ऑनलाईन सेलर आपल्या वस्तू विकण्यासाठी पिंटरेस्ट चा वापर करतात. आज जगभरात 45 कोटीहून अधिजण Pinterest चा वापर करत आहेत. चला तर मग चानून घेऊया Pinterest बद्दल आणि ते कसे वापरावे.

Pinterest कसे सुरु करावे ?

PInterest हे अँप्लिकेशन आणि वेबसाईट अशा दोन्ही मध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही लॅपटॉप किव्हा संगणक वापरकर्ते असाल तर तुम्ही pinterest चा वेबसाईटचा वापर करू शकता पण जर तुम्ही IOS किव्हा अँड्रॉइड वापरकर्ते असाल तर तुम्हाला अँप स्टोअर मधून Pinterest चे अँप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल करावे लागेल.

Pinterest वर खाते कसे Open करावे ?

Pinterest डाउनलोड केल्यांनतर आपल्याला pinterest मध्ये अकाउंट तयार करावे लागते. Pinterest वर अकाउंट ओपन केल्यावर आपण त्यातील सर्व सुविधेचा वापर करू शकतो. Pinterest वर अकाउंट तयार करण्यासाठी आपण आपल्या फेसबुक किव्हा Gmail अकाउंटचा देखील वापर करू शकतो.

तुम्हाला Pinterest वर अकाउंट कसे ओपन करायचे हे माहित करून घ्यायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Pinterest चे अँप्लिकेशन ओपन करा.
 2. Pinterest अँप्लिकेशन ओपन केल्यांनतर तुमचा समोर Welcome to Pinterest असे दिसेल व त्याखाली Continue with Google असा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
 3. Continue with Google वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचा मोबाईलमधील कोणते gmail अकाउंट वापरायचे आहे याबाबतीत विचारण्यात येईल तेथे तुम्ही तुम्हाला जे gmail अकॉउंट वापरायचे आहे ते निवडा.
 4. Gmail अकाउंट निडल्यानन्तर तुमचा समोर तुमचे लिंग विचारण्यात येईल तेथे तुमचे लिंग निवडा.
 5. लिंग निवडून झाल्यांनतर तुम्हाला तुमचे देश विचारण्यात येईल तेथे तुमचे देश निवडा.
 6. देश निवडून झाल्यांनतर तुम्हाला कशाची आवड आहे याबतीत ५ किव्हा त्यापेक्षा जास्त आवड निवडायला सांगतील व ते निवडून झाल्यांनतर उजव्या कोपऱ्यात लाल रंगात असणाऱ्या Next पर्यायावर क्लिक करा.
 7. Next पर्यायावर क्लिक केल्यावर pinterest थोडं वेळ घेईल आणि तुमचे pinterest अकाउंट चालू होईल आणि तूम्हाला तुम्ही अगोदर निवडलेल्या आवडीनुसार pin दिसू लागतील.

अशा प्रकारे आपण Pinterest वर अकाऊंन्ट ओपन करू शकतो.

Pinterest वर Pin आणि Board म्हणजे काय आहे ?

Pinterest वर भरपूर प्रमाणात ऐकले जाणारे शब्द म्हणजे Pin आणि Board. Pin आणि Board हे pinterest वापरकर्त्यांसाठी असलेले पर्याय आहेत.

Pin :- Pin म्हणजे आपण जे pinterest वर फोटो टाकतो त्याला pin असे म्हणतात. जसे कि instagram, फेसबुक मध्ये पोस्ट हा शब्द वापरला जातो त्याप्रमाणे Pinterest मध्ये Pin हा शब्द वापरला जातो. Pin मध्ये आपण व्हिडिओ आणि फोटो टाकू शकतो. Pinterest मध्ये आपण पिन schedule सुद्धा करू शकतो.

Pin मधील व्हिडिओ हे 4 सेकंद ते 15 मिनिटांपर्यंत असावे लागते आणि ते रुंदी आणि उंचीत किमान 1:91:1 आणि कमाल 1:2 इतके असावे लागते. त्याचप्रमाणे पिनमधील फोटो हे 735 X 1102 पिक्सेल इतके असावे लागते व फोटोची फाईल साईझ हि 20 Mb पर्यंत असावी लागते.

Board :- Board हे पिंटरेस्ट मध्ये फोल्डर किंव्हा category सारखे कार्य करते. Board हे पिन save करण्यासाठी असतात म्हणजेच आपण पिन तयार करताना ते वेगवेगळ्या Board मध्ये save करू शकतो.

Board चे नाव आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळे ठेऊ शकतो. Board मुळे सर्व एकाद्या विषयाचे pin त्याविषयानुसार त्या त्या board मध्ये ठेवण्यास मदत होते.

Pinterest वर Pin कसे तयार करावे ?

जर तुम्हाला तुमचा pinterest अकाउंट वर Pin कसे तयार करावे हे समजायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Pinterest चे अँप्लिकेशन ओपन करा.
 2. Pinterest चे अँप्लिकेशन ओपन केल्यांनतर तुमचा समोर pinterest वरील पिन्स दिसू लागतील, तेथे खालचा बाजूस मधल्या भागात असणाऱ्या अधिकचा चिन्हावर क्लिक करा.
 3. अधिकचा चिन्हावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यातील Pin पर्यायावर क्लिक करा.
 4. Pin पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर मोबाईल मधील फोटोस आणि व्हिडिओस दिसू लागतील त्यातील जे फोटो किंव्हा व्हिडिओ तुम्हाला pin करायचे आहे ते निवड व उजव्या कोपऱ्यात लाल रंगात असणाऱ्या Next पर्यायावर क्लिक करा.
 5. Next पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर Pin बद्दल माहिती टाकण्यासाठी पर्याय येतील जसे कि Title, पिन बद्दल माहिती, आणि वेबसाईट, Alt टेक्स्ट ती सर्व माहिती भरा.
 6. माहिती भरून झाल्यावर उजव्या कोपऱ्यात लाल रंगात असणाऱ्या Next पर्यायावर क्लीक करा.
 7. Next पर्यायावर क्लीक केल्यांनतर तुमचा समोर Board निवडण्यासाठी विचारण्यात येईल तेथे तुम्हाला pin कोणत्या Board मध्ये save करायचा आहे त्या Board वर क्लिक करा, Pin पब्लिश होईल.

अशाप्रकारे आपण pinterest वर Pin टाकू शकतो.

Pinterest वर Board कसे तयार करावे ?

जर तुम्हाला तुमचा pinterest अकाउंट वर Board कसे तयार करावे हे समजायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Pinterest चे अँप्लिकेशन ओपन करा.
 2. Pinterest चे अँप्लिकेशन ओपन केल्यांनतर तुमचा समोर pinterest वरील पिन्स दिसू लागतील, तेथे खालचा बाजूस मधल्या भागात असणाऱ्या अधिकचा चिन्हावर क्लिक करा.
 3. अधिकचा चिन्हावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यातील Board पर्यायावर क्लिक करा.
 4. Board वर क्लिक केल्यावर तुमचा समोर Board बद्दल माहिती टाकण्यासाठी काही पर्याय येतील जसे कि Board चे नाव, Board ची visibility इत्यादी. तेथे तुमचा आवडीनुसार Board चे नाव टाका.
 5. Board चे नाव टाकल्यानन्तर तेथे खाली असणाऱ्या Visibility पर्याय बंद असेल, जर ते बंद नसेल तर त्यावर क्लिक करून ते बंद करा. Visibility पर्याय चालू असले तर तुमचे board तुम्हाला सोडून बाकी कोणालाही दिसणार नाही.
 6. Visibility बंद ठेवल्यानन्तर उजव्या कोपऱ्यात लाल रंगात असणाऱ्या Next पर्यायावर क्लीक करा.

अशाप्रकारे आपण pinterest वर Board तयार करू शकतो.

Pinterest वर प्रोफाइल फोटो कसे ठेवावे ?

PInterest वर प्रोफाईल फोटोचा ठिकाणी आपण आपले किंव्हा आपल्या आवडीचे असणारे एकाधे फोटो ठेऊ शकतो. Business अकाउंट मध्ये आपण प्रोफाइल फोटोचा ठिकाणी कंपनीचे logo ठेऊ शकतो.

जर तुम्हालाही तुमचा pinterest अकाउंट वर प्रोफाईल फोटो कसे ठेवावे हे समजायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Pinterest चे अँप्लिकेशन ओपन करा.
 2. उजव्या कोपऱ्यातील खालचा बाजूस असणाऱ्या फोटो वर क्लिक करा.
 3. फोटो वर क्लिक केल्यावर वरचा बाजूस उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या उभ्या तीन बिंदूवर क्लिक करा.
 4. तीन बिंदूवर क्लिक केल्यावर तुमचा समोर काही पर्याय येतील त्यातील settings पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
 5. Settings पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचा समोर Pinterest अकाउंट सेटिंग विषयी अनेक पर्याय दिसतील त्यातील Edit profile हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
 6. Edit profile या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर एक फोटो दिसेल व त्याखाली काही प्रोफाइल संबंधित पर्याय दिसतील जसे कि Name, Username असे, त्यातील फोटोवर क्लिक करा व नन्तर तुमचा मोबाइल मधील तुम्हाला जो फोटो अपलोड करायचा ते ठेवा व वरचा बाजूस उजव्या कोपऱ्यात लाल रंगामध्ये असणाऱ्या Done पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण pinterest वर प्रोफाइल फोटो ठेऊ शकतो.

Pinterest Business काय आहे ?

Pinterest Business हे Business अकाउंट उघडण्यासाठी असणारे pinterest वरील पर्याय आहे. याचा वापर तुम्हाला जर तुमचा business साठी pinterest अकाउंट ओपन करायचे असल्यास हे पर्याय वापरू शकता. या पर्यायामुळे pinterest अकाउंट मध्ये analytics चे पर्याय मिळते जे business वाढविण्यासाठी खूप मदत करते.

अशाप्रकारे या “Pinterest बद्दल माहिती आणि Pinterest कसे वापरावे ?” लेखात आम्ही Pinterest विषयी महत्वाची माहिती संगतीली आहे जी तुम्हाला pinterest समजण्यास आणि वापरण्यास नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!