Save Girl Slogans In Marathi मुली या समाजाच्या आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशिवाय आयुष्य चालू ठेवणे शक्यच नाही. एक लहान मुलगी हि भविष्यात चांगली मुलगी, एक बहीण, एक पत्नी आणि एक आई सुद्धा असू शकते. जर आपण जन्मापूर्वी मुलींना मारले किंवा जन्मानंतर त्यांची काळजी घेतली नाही तर भविष्यात आम्हाला प्रेमळ मुलगी, बहीण, पत्नी किंवा आई मिळणार नाही.
” मुलगी वाचवा ” वर मराठी घोषवाक्य Save Girl Slogans In Marathi
दुर्दैवाने, आपल्या समाजात मुलीशी चांगली वागणूक दिली जात नाही. त्यांच्यासाठी आपण आवाज उठविला पाहिजे. या पोस्टमध्ये मुलगी वाचवा याविषयी घोषवाक्य देण्यात आलेले आहेत. या मुलगी वाचवा या घोषवाक्यांचा उपयोग बाल जागरूकता अभियानामध्ये केला जाऊ शकतो.
मुलगी म्हणजे वडिलांच्या डोळ्यांची शीतलता.
मला ही सुंदर पृथ्वी पाहू द्या – कृपया जन्मापूर्वी मला मारू नका.
मुलापेक्षा मुलगी बरी,
प्रकाश देते दोन्ही घरी .
मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती ,
गुणवान मुली हि तर देशाची संपत्ती.
मुलगा-मुलगी भेद नको,
मुलगी झाली खेद नको.
मुलगी नाही तर आई नाही ,
मुलगी नाही तर मुलगा नाही.
मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी ,
मुलगी हि त्या दिव्याची वात आहे.
आई पाहिजे, पत्नी पाहिजे,
बहीण पाहिजे, मग मुलगी का नको ?
मुलगी वाचवा,
मुलगी शिकवा.
मुलींना समजू नका भार,
जीवनाचा खरा आहे आधार.
आज जन्मलेली मुलगी ,
उद्याची आई आहेत.
मुलींना वाचवा, मुलींना शिकवा,
देशात साक्षरता वाढवा.
पहिली बेटी ,
तूप रोटी.
तर मित्रांनो ” मुलगी वाचवा ” वर मराठी घोषवाक्य Save Girl Slogans In Marathi हे तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा, धन्यवाद .
हे सुद्धा जरूर वाचा.
- शिक्षक दिन वर घोषवाक्य
- स्वातंत्र्य दिन वर घोषवाक्य
- नेत्रदान वर घोषवाक्य
- स्वातंत्र्य सेनानी चे घोषवाक्य
- मराठी भाषा वर घोषवाक्य
- पाणी वाचवा वर घोषवाक्य