marathi mol

”स्वच्छता” वर मराठी घोषवाक्य Slogans On Cleanliness In Marathi

Slogans On Cleanliness In Marathi स्वच्छता हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि स्वतःच याचा एक विशाल अर्थ आहे. निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगून प्रत्येकाने खरोखरच निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आयुष्यभर स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. स्वच्छता, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी खरोखरच एक अमूर्त अवस्था आहे.

Slogans On Cleanliness In Marathi

”स्वच्छता” वर मराठी घोषवाक्य Slogans On Cleanliness In Marathi

निरोगी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे आणि ते कायम राखणे आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे केवळ शरीराच्या स्वच्छतेबद्दलच नव्हे तर याचा अर्थ सर्वत्र स्वच्छता (शरीर, मन, आत्मा, घर, आजूबाजूचे वातावरण, नदी, आणि संपूर्ण ग्रहाची स्वच्छता) होय.

स्वच्छ सुंदर परिसर,
जीवन निरोगी निरंतर.

 

वैयक्तिक स्वच्छतेची महती,
रोगापासुन मिळेल मुक्ति.

 

”स्वच्छता” माणसाचे आत्मदर्शन घडविते.

 

स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
देईल सामाजिक आरोग्याला गती.

 

रंग भगवा त्यागाचा,
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.

 

रोज काढा केर,
विषाणू करा ढेर.

 

स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
आरोग्य आपले निरोगी बनवू.

 

धरती, पाणी, हवा, ठेवा साफ,
नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ.

 

स्वच्छ घर स्वच्छ आंगण,
प्रसन्न ठेवू वातावरण.

 

स्वच्छ सुंदर परिसरातुनच,
सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.

 

असेल दृष्टी,
तर दिसेल स्वच्छ सृष्टी.

 

जेवणापूर्वी धुवा हात,
जेवणानंतर धुवा दात.

 

कचरा कुंडीचा वापर करू,
सुंदर परिसर निर्माण करू.

 

स्वच्छता असे जेथे,
आरोग्य वसे तेथे.

 

पुढील पिढीसाठी चांगली देन,
माझा परिसर स्वच्छ ठेवेन.

 

थोडी तरी ठेवा जाण,
सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.

 

स्वच्छता म्हणजे,
आपलं शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असणे.

 

परिसर स्वच्छ ठेवाल,
तर निरोगी व्हाल.

 

घर असेल साफ,
तर सर्व गुन्हे माफ.

 

गटार असेल पास तर,
मजेत राहतील ड़ास.

 

नखे कापा बोटाची,
नाही होणार व्याधी पोटाची.

 

स्वच्छ घर, सुंदर परिसर,
शोचखड्याचा करुया वापर.

 

गावकरी मिळुन एक काम करू,
शौचालयाचा वापर करू.

 

शौचालय असेल जेथे,
खरी प्रतिष्ठा येईल तेथे.

हे सुद्धा जरूर वाचा.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!