Slogans On Marathi Bhasha २७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी भाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली.
“मराठी भाषा” वर घोषवाक्य Slogans On Marathi Bhasha
लाभले आम्हांस भाग्य , बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य , ऐकतो मराठी !!
आम्हाला गर्व आहेत मराठी असल्याचा !!
माझ्या मराठी मातीचा , लावा ललाटास टिळा !
हिच्या संगाने जागल्या , दऱ्याखोऱ्यातील शिळा !!
माझा मराठीचे बोलू कौतुके !
परी अमृतातेही पैजासी जिंके !
ऐसी अक्षरे रसिके I मिळवीन !!
घासल्याशिवाय धार नाही , तलवारीच्या पातीला !
मराठ्यांशिवाय पर्याय नाही , महाराष्ट्राच्या मातीला !!
रुजवू मराठी, फुलवू मराठी !
चला बोलू फक्त मराठी !!
मान आहेत मराठी भाषेचा आपुल्या मनी !
शुभेच्छा तुम्हा सर्वास मराठी भाषा दिनी !!
आपणच आपणास तारी ,
मराठीची किमिया लय न्यारी !!
बोलावे शुद्ध , ऐकावे शुद्ध , वाचावे शुद्ध , लिहावे शुद्ध ,
मराठीच्या उद्धारासाठी ,कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध !!
आपणच आपल्या उद्धारासाठी ,
चला बोलूया मराठी !!
माझा शब्द माझे विचार , माझा श्वास माझी स्फूर्ती ,
माझ्या रक्तात मराठी , माझी माय मराठी !!
आम्हाला अभिमान आहेत महाराष्ट्रीयन असल्याचा ,
आम्हाला गर्व आहेत मराठी भाषेचा !!
आम्ही जपतो आमची संस्कृती ,
आमची निष्ठा आहेत मराठी मातीशी !!
जय जय महाराष्ट्र माझा , मनोमनी बसला शिवाजी राजा ….
वंदितो या भगव्या ध्वजा , नभी गर्जतो जय महाराष्ट्र माझा !!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ,
धर्म , पंथ , जात , एक मानतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी …..
महाराष्ट्राची यशो गाथा , महाराष्ट्राची शौर्य कथा !
पवित्र माती लावू कपाळी , धरती मातेच्या चरणी माथा !!
जिच्यासाठी केला होता अट्टहास ,
थांबवूया आता आपण मराठीचा ऱ्हास !!
कपाळी केशरी टिळा लावीतो ,
महाराष्ट्र देश तुला मानाने वंदितो !!
तर मित्रांनो “मराठी भाषा” वर घोषवाक्य Best Slogans On Marathi Bhasha हे तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा, धन्यवाद .