marathi mol

WhatsApp बद्दल संपूर्ण माहिती WhatsApp Information In Marathi

WhatsApp Information In Marathi मित्रानो तुम्ही whatsapp च नाव ऐकलच असाल, whatsapp हे ऑनलाईन message करण्याचे अँप्लिकेशन आहे. आजकाळ तर प्रतेक्काचा मोबाईल मध्ये whatsapp चे अँप्लिकेशन इन्स्टॉल असते. Whatsapp चा शोध ब्रायन ऍक्टन आणि जॅन कौम यांनी 2009 मध्ये लावला. Whatsapp च अँड्रॉइड आणि IOS वापरकर्त्यांसाठी अँप्लिकेशन आहे तर संगणक आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी अँप्लिकेशन आणि वेबसाईट दोन्ही आहे.

WhatsApp Information In Marathi

WhatsApp बद्दल संपूर्ण माहिती WhatsApp Information In Marathi

याचा वापर करून आपण एकमेकांस फोटो, व्हिडिओस, ऍनिमेशन्स आणि अनेक प्रकारचे फाइल्स पाठवू शकतो. आज whatsapp चा वापर संपूर्ण जगभर होत आहे. Whatsapp हे 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग whatsapp बद्दल भरपूरकाही माहिती जाणून घेऊया.

Whatsapp मध्ये अकाउंट कसे open करावे ?

Whatsapp मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याकडं स्वतःचा मोबाइल नंबर असणं गरचेच आहे कारण whatsapp messages पाठवण्यासाठी आपल्या नंबरच वापर करतो

जर तुम्हाला whatsapp वर अकाउंट खोलायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 • अँड्रॉइड किव्हा ios मोबाइल असेल तर अँप स्टोअर मध्ये whatsapp अँप्लिकेशन डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
 • अँप्लिकेशन इन्स्टॉल केल्यांनतर अँप्लिकेशन open करा, अँप्लिकेशन ओपन केल्यांनतर तुमचा समोर whatsapp चे privacy आणि policy येतील तेथे हिरव्या रंगात असणाऱ्या Accept and continue बटनावर क्लिक करा.
 • तुमचा समोर तुमचा मोबाइल नंबर टाकण्यासाठी आणि देश निवडण्यासाठी पर्याय येईल, तेथे तुमचा देश निवडा आणि तुमचा मोबाइल नंबर टाका व खाली हिरव्या रंगात असणारे Next बटनावर क्लिक करा.
 • Next बटनावर क्लिक केल्यांनतर, तुम्हाला मोबाइल नंबर खात्री करण्यासाठी विचारण्यात येईल तेथे Ok वर क्लिक करा.
 • तुम्हाला whatsapp कडून तुमचा मोबाइल नंबर वर message ने ६अंकी OTP येईल तो स्क्रीन वर OTP टाकण्यासाठी येणाऱ्या बॉक्स मध्ये टाका व OK वर क्लिक करा.
 • Mobile नंबर व्हेरिफाय झाल्यांनतर तुम्हाला तुमचा मोबाइल मधील save केलेले contacts वाचू शकतो का याबद्दल विचारण्यात येईल तेथे Continue बटनावर क्लिक करा, व मोबाइल कडून whatsapp ला contacts ला परमिशन देण्या बाबत विचारण्यात येईल तेथे Allow वर क्लिक करा.
 • तुम्हाला whatsapp चे प्रोफिल फोटो ठेवण्याबात आणि प्रोफिल नाव काय ठेवायचे याबाबतीत विचारण्यात येईल तेथे तुम्ही तुमचे नाव टाकू शकता आणि मोबाइल मधील हवे ते फोटो प्रोफिल फोटो म्हणून ठेऊ शकता व हे झाल्यांनतर Next बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण whatsapp वर अकाउंट ओपन करू शकतो.

Whatsapp मध्ये प्रोफाईल फोटो कसे ठेवावे ?

Whatsapp प्रोफाइल फोटो ठिकाणी आपण आपले फोटो किव्हा आपल्या आवडीचे फोटो ठेऊ शकतो. Whatsapp प्रोफाइल फोटोमुले एकमेकांची ओळख पटते.

जर तुम्हालाही तुमचा whatsapp वर प्रोफाइल फोटो ठेवायचे आहे तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाईल मधील whatsapp चे अँप्लिकेशन उघडा आणि उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या उभ्या तीन बिंदूवर क्लिक करा.
 • तुमचा समोर काही पर्याय दिसतील तेथे settings या पर्यायावर क्लिक करा.
 • Settings वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचा whatsapp account ची सेटिंग येईल तेथे whatsapp कडून ठेलेल्या असणाऱ्या माणसाच्या सावलीसारखे फोटो दिसेल त्यावर क्लिक करा व आपल्या मोबाइल मधून जो कोणता फोटो निवडायचा आहे तो निवडा.
 • फोटो निवडल्यानन्तर तुम्ही त्याला हवं असेल तर crop करू शकता व नन्तर Ok बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण whatsapp मध्ये प्रोफाइल फोटो बदलू शकतो.

Whatsapp मध्ये Group कसे बनवावे ?

Whatsapp वर दिवसेंदिवस काहीनाकाही कामासाठी किव्हा मनोरंजनासाठी अनेकजण ग्रुप तयार करत असतात.

तुम्हाला देखील जणुन घ्यायचे असेल कि whatsapp ग्रुप असे तयार करायचे तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाइल मधील whatsapp अँप्लिकेशन ओपन करा आणि उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या उभ्या तीन बिंदूवर क्लिक करा.
 • तुमचा समोर अनेक पर्याय येतील त्यातील New group या पर्यायावर क्लिक करा.
 • New group वर क्लिक केल्यानंतर तुमचा समोर तुमचा contacts ची यादी येईल त्यातील तुम्ही जे नंबर्स तुम्हाला ग्रुप मध्ये add करायचे आहेत त्यांना निवडा व खाली उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या हिरव्या रंगाच्या बाणावर क्लिक करा.
 • तुम्ही निवडलेले नंबर तुमचा समोर दिसतील व जर तुम्हाला काही नंबर काढायचे असेल तर तुम्ही तेथून काढू शकता व तुम्हाला ते ग्रुप चे नाव ठेवायचे आहे ते ग्रुपचा नाव टाकण्यासाठी असणाऱ्या बॉक्स मध्ये टाका व उजव्या बाजूस असणाऱ्या हिरव्या रंगात असणाऱ्या बटनावर क्लीक करा.

अशा प्रकारे आपण whatsapp मध्ये ग्रुप तयार करू शकतो आणि एका whatsapp ग्रुप मध्ये आपण 256 पर्यंत contacts ऍड करू शकतो.

Whatsapp मध्ये voice कॉल कसे लावावे ?

Whatsapp वर 2015 पासून फ्री voice कॉल सेवा सुरु करण्यात आली. आज 5 करोडहून अधिक voice कॉल्स रोज whatsapp वर केले जात आहेत.

जर तुम्हालाही whatsapp voice कॉल करायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाइल मधील whatsapp अँप्लिकेशन उघडा, तुमचा समोर तुमचा कॉन्टॅक्टस ची यादी दिसेल त्यातील ज्याला तुम्हाला voice कॉल करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.
 • ज्याला voice कॉल करायचा आहे त्याच्या नावावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर केलेली chatting दिसेल तेथे वरचा बाजूस कॉलचा चिन्ह असेल त्यावर क्लिक करा.
 • कॉल चा चिन्हावर क्लिक केल्यावर, कॉल लागेल व खालचा बाजूस काही पर्याय दिसू लागतील त्यांचा वापर करून आपण कॉल speaker वर ठेऊ शकतो, कॉल बंद करू शकतो.

अशा प्रकारे आपण whatsapp चा वापर करून voice कॉल लावू शकतो.

Whatsapp मध्ये video कॉल कसे लावावे ?

Voice कॉल चा फिचर नन्तर whatsapp ने 14 नोव्हेंबर 2016 मध्ये विडिओ कॉल चे फिचर लाँच केले ज्याचा वापर करून आपण एकमेकांना पाहून बोलू शकतो.

तुम्हालाही whatsapp वर विडिओ कॉल लावायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाइल मधील whatsapp अँप्लिकेशन उघडा, तुमचा समोर तुमचा कॉन्टॅक्टस ची यादी दिसेल त्यातील ज्याला तुम्हाला विडिओ कॉल करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.
 • ज्याला विडिओ कॉल करायचा आहे त्याच्या नावावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर आपन केलेली chatting समोर दिसेल तेथे वरचा बाजूस सफेद रंगात असणारा कॅमेरा चा चिन्ह असेल त्यावर क्लिक करा.
 • कॅमेरा चा चिन्हावर क्लिक केल्यावर, तुमचा कॉल त्या नंबर ला लागेल परंतु जो पर्यंत समोरचा व्यक्ती कॉल उचलत नाही तो पर्यंत तुम्हाला त्याच विडिओ मोबाइल वर दिसणार नाही, पण जेव्हा तो कॉल उचलेल तेव्हा तुम्हाला विडिओ दिसायला सुरु होईल व तुमचा विडिओ त्याला दिसू लागेल.

अशा प्रकारे आपण whatsapp चा मदतीने विडिओ कॉल लावू शकतो.

Whatsapp मध्ये कोणी त्रास देत असेल तर Block कसे करावे ?

आपण अनेकदा आपला whatsapp नंबर अनेक ठिकाणी देत असतो त्यामुळे काहीवेळा आपल्याला फसवणुकीचे मेसेज पाठवत असतात. तर अशा वेळी या नंबरस ना ब्लॉक करणे योग्य असते.

ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाइलमधील whatsapp अँप्लिकेशन ओपन करा, तुमचा समोर तुमचा whatsapp कॉन्टॅक्टस ची लिस्ट दिसेल तेथे जो नंबर तुम्हाला ब्लॉक करायचे आहे त्यावर क्लिक करा.
 • नंबर वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर त्या नंबर ने पाठविले मेसेज दिसू लागतील तेथे उजव्या कोपऱ्यात हिरव्या रंगात असणारे तिन उभ्या बिंदूवर क्लिक करा.
 • तिन बिंदूंवर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर काही पर्याय दिसतील तेथे More पर्याय वर क्लीक करा.
 • More वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर आणखी काही पर्याय दिसून येतील, त्यात Block हा पर्याय असेल तर त्यावर क्लिक करा.
 • Block वर क्लिक केल्यानन्तर तुम्हाला whatsapp कडून खात्री करण्यासाठी विचारण्यात येईल तेथे पुन्हा Block पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण whatsapp मध्ये नंबर ला Block करू शकतो.

Whatsapp मध्ये Dark theme कशी ठेवावी ?

Whatsapp ने जानेवारी 2020 मध्ये Dark मोड थिम पर्याय सुरु केले. डार्क मोड मुले आपल्या डोळ्यावर मोबाइल स्क्रीन मधून आपल्या डोळ्यावर येणाऱ्या निळ्या प्रकाशाची प्रखरता कमी होते व बराच काळ मोबाइल वापरल्यामुळे डोळ्यावर येणारा ताण येत नाही.

तर whatsapp मध्ये dark मोड थिम सेट करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

 • आपल्या मोबाइल मधील whatsapp अँप्लिकेशन उघडा व वरच्या भागात उजव्या बाजूस असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 • बिंदूंवर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर काही पर्याय येतील त्यातील settings वर क्लिक करा.
 • सेटीन्ग्स मध्ये आल्यानन्तर तुमचा समोर काही पर्याय येतील तेथे chats या पर्यायावर क्लिक करा.
 • chats वर क्लिक केल्यानन्तर, प्रथम क्रमांकावर Theme असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून Dark हे पर्याय निवडा व Ok बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण whatsapp मध्ये डार्क मोडे थिम चालू करू शकतो.

तर मित्रानो या “Whatsapp बद्दल माहिती आणि whatsapp कसे वापरावे ?” लेखात whatsapp बद्दलची माहिती सांगितली आहे जी तुम्हाला whatsapp वापरण्यास नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

1 thought on “WhatsApp बद्दल संपूर्ण माहिती WhatsApp Information In Marathi”

Leave a Comment

error: Content is protected !!