marathi mol

YouTube बद्दल संपूर्ण माहिती YouTube Information In Marathi

YouTube Information In Marathi मित्रानो Youtube हे google कंपनीचे विडिओ शेअरिंग साठी असलेले ऑनलाईन व्यासपीठ आहे. Youtube चा शोध जावेद करीम, स्टीव्ह चेन, चाड हर्ले यांनी 14 फेब्रुवारी 2005 मध्ये लावला. आजच्या काळात संपूर्ण जग youtube वापरत आहे.

YouTube Information In Marathi

YouTube बद्दल संपूर्ण माहिती YouTube Information In Marathi

गूगलने 2006 मध्ये Youtube विकत घेतले. Youtube हे आजच्या काळात वेबसाईट आणि अँप्लिकेशन अशा दोन्ही मध्ये उपलब्ध आहे. चला तर मग youtube बद्दल खूप काही जाणून घेऊया.

YouTube कसे सुरु करावे ?

Youtube हे अँप्लिकेशन आणि वेबसाईट अशा दोन्ही मध्ये उपलब्ध असल्यामुळे संगणक आणि लॅपटॉप वापरकर्ते ब्राउसर मधून जाऊन youtube सुरु करू शकतात आणि IOS आणि अँड्रॉइड वापरकर्ते अँप स्टोअर मधून youtube चे अँप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल करुन youtube ओपन करू शकतात, त्याचप्रमाणे IOS आणि अँड्रॉइड वापरकर्ते ब्राउसर मधून जाऊनसुद्धा youtube ओपन करू शकतात.

अशा प्रकारे आपण youtube उघडू शकतो. Youtube उघडल्यानन्तर आपण व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेऊ शकतो पण काही पर्यायांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला youtube वर sign in गरजेचे आहे.

Youtube वर sign in करण्यासाठी आपल्याकडे Gmail अकाउंट असणे गरजेचे आहे. जर तुमचा कडे अगोदरच Gmail अकाउंट असेल तर youtube उघडल्यानन्तर उजव्या बाजूस कोपऱ्यात असणाऱ्या sign in बटनावर क्लिक करा व आपले Gmail अकाउंट चे ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

अशाप्रकारे आपण आपल्या मोबाइल किव्हा लॅपटॉप मध्ये youtube सुरु करू शकतो.

Youtube व्हिडिओ शेअर कसे करावे ?

Youtube वरील शेअर फिचरमुळे आपण अवघ्या काही सेकंदात व्हिडिओ एकमेकांना शेअर करू शकतो. आज अनेक जण youtube वर व्हिडिओ पाहत असतात, अनेकजण मजेशीर आणि खूप छान असणाऱ्या व्हिडिओस एकमेकांना शेअर करीत असतात.

जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल कि youtube वरीळ व्हिडिओ कसे शेअर करावे तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाइल किव्हा लॅपटॉप मधील youtube सुरु करा.
 2. youtube सुरु झाल्यांनतर जो व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे त्यावर क्लिक करा.
 3. व्हिडिओ वर क्लिक केल्यांनतर तो व्हिडिओ सुरु होईल, व्हिडिओचा खाली तुम्हाला एक डावीकडून उजवीकडे वळलेला एक बाण दिसेल त्यावर क्लिक करा.
 4. बाणावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर शेअर करण्यासाठी अनेक पर्याय दिसतील जसे कि Whatsapp, ट्विटर, फेसबुक इत्यादी, अशाप्रकारे तुम्ही जेथे तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे तेथे क्लिक करून तेथून तो तुम्ही तुमचा मित्र-मैत्रणीना, नातेवाईकांना पाठवू शकता.

अशाप्रकारे आपण youtube वर व्हिडिओ शेअर करू शकता.

Youtube विडिओ ऑफलाईन कशा पाहावे ?

Youtube वरील विडिओ ऑफलाईन save करण्याचे फिचर youtube ने २०१४ मध्ये सुरु केले. हे फिचर फक्त IOS आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आहे. या फिचचा वापर करून आपण विडिओ save करू शकतो ज्यामुळे आपण व्हिडिओ नेटवर्क नसलं तरी देखील पाहू शकतो आणि या फिचर चा आजून एक फायदा तो म्हणजे कि जर एखादा आवडता व्हिडिओ आपल्याला अनेकदा पाहायचा असेल तर आपल्याला त्यासाठी प्रत्येकवेळा इंटरनेट डेटा वापरण्याची गरज भासणार नाही.

तुम्हालाहि जाणून घायचे आहे कि व्हिडिओ ऑफलाईन कशा save कराव्या तर पुढील steps करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील youtube चे अँप्लिकेशन उघडा.
 2. अँप्लिकेशन ओपन झाल्यानन्तर जो व्हिडिओ तुम्हाला ऑफलाईन save करायचा आहे त्यावर क्लिक करा.
 3. व्हिडिओ वर क्लिक केल्यावर तो सुरु होईल, तेथे व्हीडिओचा खालचा बाजूस तुम्हाला खालचा दिशेस टोक केलेले एक बाण दिसेल त्यावर क्लिक करा.
 4. बाणावर क्लिक केल्यावर तुम्हाला व्हिडिओची quality निवडण्यासाठी विचारले जाईल जसे कि High, Medium, Low तुम्ही तेथे तुम्हाला असणारी quality निवडा.
 5. व्हिडिओ quality निवडल्यानन्तर खाली असणारे Ok बटनावर क्लीक करा, डाउनलोड सुरु होईल.

अशा प्रकारे आपण Youtube ऑफलाईन डाउनलोड या फीचर्सचा वापर करून विडिओ ऑफलाईन save करू शकतो.

Youtube शॉर्ट्स काय आहे ?

Youtube shorts हे Youtube ने मार्च 2021 मध्ये सुरु केलेले फिचर आहे ज्यामध्ये creater 58 सेकंद पर्यंतचा विडिओ शेअर करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे youtube shorts चा मदतीने creator कमवू शकतो. Youtube ने creators साठी 7.41 लाखाचे निधी जाहीर केले आहे. जर तुम्हालाही youtube shots तयार करायचे असेल तर तुम्हाला फक्त एका चांगला camera असणाऱ्या मोबाइल ची गरज लागेल. अशाप्रकारे youtube शॉर्ट्स हे youtube कडून तयार केलेले उत्तम फिचर आहे.

Youtube मध्ये Dark थिम कसे चालू करावे ?

मित्रानो तुम्हाला माहीतच असेल कि youtube वर सतत् व्हिडिओ पाहून डोळ्यांवर ताण येतो व डोळ्यांना त्रास होतो त्यामुळे youtube ने देखील डार्क थिम हे फिचर सुरु केले. Dark थिम मुळे मोबाइल वरून आपल्या डोळ्यांवर येत असणाऱ्या किरणांची प्रखरता कमी होते आणि आपल्या डोळ्यांवर येणारा ताण सुद्धा कमी होतो.

तुम्हाला जर youtube मध्ये Dark थिम चालू करायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील youtube चे अँप्लिकेशन उघडा.
 2. अँप्लिकेशन ओपन झाल्यानन्तर, उजव्या कोपऱ्यात शेवटला असणाऱ्या आयकॉन वर क्लिक करा.
 3. आयकॉन वर क्लिक केल्यावर तुमचा समोर अनेक पर्याय येतील त्यातील settings पर्यायवर क्लिक करा.
 4. Settings पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर पुन्हा अनेक पर्याय येतील त्यातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या General पर्यायावर क्लिक करा.
 5. General पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा समोर पुन्हा अनेक पर्याय येतील तेथे Appearance म्हणून पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
 6. Appearance पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर तीन पर्याय येतील त्यातील खाली असणाऱ्या Dark थिम वर क्लिक करा व Ok करा.

अशाप्रकारे आपण youtube वर Dark थिम चालू करू शकतो.

Youtube वर channel कसे बनवावे ?

मित्रानो आज अनेक जण youtube चॅनेल तयार करून व्हिडीओस टाकत आहेत.

जर तुम्हालाही youtube वर व्हिडिओस कसे टाकायचे हे समजायचे आहे तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील youtube चे अँप्लिकेशन उघडा.
 2. अँप्लिकेशन ओपन झाल्यानन्तर, उजव्या कोपऱ्यात शेवटला असणाऱ्या आयकॉन वर क्लिक करा.
 3. आयकॉन वर क्लिक केल्यावर तुमचा समोर अनेक पर्याय येतील त्यातील Your channel या पर्यायवर क्लिक करा.
 4. Your channel पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर तुमचा youtube चॅनेल चे नाव काय ठेवायचे ते विचारण्यात येईल ते तुम्ही तुमचा आवडीनुसार टाका व खालीं निळ्या रंगात असणाऱ्या Create channel या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण youtube वर अवघ्या काही सेकंदामध्ये चॅनेल बनवू शकतो.

Youtube वर विडिओ कशी अपलोड करावी ?

Youtube चॅनेल बनवल्यानन्तर सर्वात महत्वाचे काम असते ते म्हणजे व्हिडिओ तयार करून अपलोड करणे.

जर तुम्हाला देखील समजायचे असेल कि youtube वर व्हिडिओ कसे अपलोड करायचे तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील youtube चे अँप्लिकेशन उघडा.
 2. Youtube चे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर खालचा बाजूस मधल्या भागात अधिक चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.
 3. अधिक चा चिन्हावर क्लिक केल्यावर तुमचा समोर 2 पर्याय येतील पहिला व्हिडिओ आणि दुसरा Live त्यातील Video वर क्लिक करा.
 4. व्हिडिओ वर क्लिक केल्यावर तुमचा समोर तुमचा मोबाइल मध्ये असलेल्या सर्व व्हिडिओ दिसू लागतील त्यातील त्या व्हिडिओ वर क्लिक करा जी व्हिडिओ तुम्हाला youtube वर अपलोड करायची आहे.
 5. व्हिडिओ वर क्लिक केल्यावर तुमचा विडिओ सुरु होईल तेथे वरती असणारे Next या पर्यायावर क्लिक करा.
 6. Next वर क्लिक केल्यावर तुमचा समोर व्हिडिओ बद्दल माहिती टाकण्यासाठी पर्याय येतील तेथील सर्व माहिती भरून टाका जसे कि व्हिडिओचे नाव, व्हिडिओ बद्दल माहिती टाका.
 7. सर्व व्हिडिओची माहिती टाकून झाल्यावर वरील ”Upload” पर्यायावर क्लिक करा.
 8. Upload पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुम्हाला स्क्रीन वर व्हिडिओची अपलोडींग सुरु होईल व काही वेळाने अपलोडींग पूर्ण होऊन व्हिडिओ publish होईल.

अशाप्रकारे आपण youtube वर व्हिडिओ अपलोड करू शकतो.

Youtube विडिओ टीव्हीवर कशा पाहावेत ?

मित्रानो youtube चा या फिचरमुळे आपण youtube वरील बघत असणाऱ्या व्हिडिओ टीव्हीवरील मोठ्या स्क्रीन वर पाहू शकतो.

तुम्हालाही जर तुमचे youtube टीव्हीसोबत जोडायचे असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील youtube चे अँप्लिकेशन उघडा.
 2. अँप्लिकेशन ओपन झाल्यानन्तर, उजव्या कोपऱ्यात शेवटला असणाऱ्या आयकॉन वर क्लिक करा.
 3. आयकॉन वर क्लिक केल्यावर तुमचा समोर अनेक पर्याय येतील त्यातील settings पर्यायवर क्लिक करा.
 4. Settings पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर पुन्हा अनेक पर्याय येतील त्यातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या Watch on TV या पर्यायावर क्लिक करा.
 5. Watch on TV या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर अनेक पर्याय दिसतील त्यातील Enter TV code या पर्यायावर क्लिक करा.
 6. Enter TV code या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर कोड टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे टीव्हीवरील youtube मधील settings मध्ये जाऊन Link with code येईल ते टाका.

अशाप्रकारे youtube चा व्हिडिओ टीव्हीवर पाहू शकतो.

तर मित्रानो अशाप्रकारे आम्ही या लेखात Youtube बद्दलची खूप महत्वाची माहिती सांगितली आहे जी तुम्हाला youtube अँप्लिकेशन समजण्यास आणि त्याचा वापर करण्यास नक्कीच मदत करेल.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!